Interesting : ‘या’ कारणाने जास्त वयाच्या मुलींकडे आकर्षित होतात मुले...!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2017 8:27 AM
मुले कोणत्या कारणाने जास्त वयाच्या मुलींकडे आकर्षित होतात, याबाबत जाणून घेऊया
विशेषत: प्रेमात वयाचे बंधन नसते. आपण कुणालाही कोणत्याही वयात पसंत करु शकता. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, मुले आपल्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींकडे अधिक आकर्षित होतात. आज याबाबत जाणून घेऊया की, मुले कोणत्या कारणाने जास्त वयाच्या मुलींकडे आकर्षित होतात. * सेक्स लाइफला चांगले समजते मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, ४० ते ५० वयात येईपर्यंत महिला सेक्सच्या बाबतीत बऱ्यापैकी मॅच्यूर होतात. अशावेळी त्या कमी वयाच्या कोणत्याही महिलेच्या तुलनेने पुरुषांना जास्त संतुष्ट करू शकतात. * आर्थिक सक्षम आपल्यापेक्षा वयाने मोठी महिला आथिक सक्षम असते. अभ्यासानुसार ३५ ते ४० वयापर्यंत ती आपल्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात बºयापैकी स्थिर झालेली असते. तिला स्वत:च्या खर्चासाठी कोणावर अवलंबून राहावे लागत नाही.* इंटीमेटपुरुषांना इंटीमेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. मात्र महिलांना पुरुषांपासून इंटीमेट व्हायला खूपच वेळ हवा असतो. याच कारणाने महिलादेखील आपल्या पेक्षा कमी वयाच्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. * परिस्थितीला व्यवस्थित हाताळतात मॅच्यूर महिला आयुष्यात येणाऱ्या चांगल्या-वाईट परिस्थितीला मोठ्या आत्मविश्वासाने हाताळू शकतात. * जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आपल्या वयाच्या अनुभवनावरून मॅच्यूर महिला आपली जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असतात. याकारणाने पुरुष त्यांच्या सहवासात रिलॅक्स अनुभवतात.Also Read : OMG : ‘या’ ७ प्रकारच्या महिलांना पुरुष ‘लाइफ पाटर्नर’ म्हणून नाकारतात !