जॉब इंटरव्ह्यूत पोषाख महत्त्वाचा !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 6:33 PM
बऱ्याचदा मुलाखतीदरम्यानच काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने हातातला जॉब जातो. त्यातील महत्त्वाचे म्हणजे योग्य पोषाखाची निवड.
आज प्रत्येकाला चांगला जॉब मिळावा अशी अपेक्षा असते. त्यासाठी तो सर्वतोपरी तयारीही करतो. मात्र, बऱ्याचदा मुलाखतीदरम्यानच काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने हातातला जॉब जातो. त्यातील महत्त्वाचे म्हणजे योग्य पोषाखाची निवड. कारण पोषाखानुसार आपला आत्मविश्वास आणि आपले व्यक्तिमत्त्व ठरत असते. मात्र बऱ्याचदा आपला पोषाख चुकतो आणि जॉब मिळण्यापूर्वीच नकार मिळतो. अशा नकारापासून वाचायचे असेल कसा पोषाख नसावा हे जाणूया.इंटरव्ह्यूला जाताना जर आपण इंडियन फॉर्मल कपडे घालताय तर त्याचा गळा खोल नको. कपड्यात साधेपणा असावा त्यात चमचम नसावी. कपड्यांबरोबरच ज्वेलरीही महत्त्वाची असते. त्यासाठी भारी भरकम चंकी ज्वेलरी घालू नका. त्यात वाईल्ड पॅटर्न, अॅनिमल प्रिंट, रफल्स व एम्ब्रॉयडरी यासारखे प्रकार वापरणे टाळा. मेक अप करतानाही काळजी घ्या. जाताना कमी मेकअप करा. फक्त काजळ, मस्कारा व लिप बाम लावणे ठीक आहे. जर तुम्ही लिपस्टीक लावताय तर त्याचा रंग सॉफ्ट व सूदिंग असायला हवा. रेड किंवा फूशिया रंग पार्टीतच चांगला दिसतो. इंटरव्ह्यूमध्ये नव्हे.