शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

‘जांभई’ देण्यावरून कळते ‘सहानुभूती’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2016 3:05 AM

 अनेक संशोधनातून जांभई आणि सहानुभूतीची भावाना यांचा परस्पर संबंध समोर आला आहे.

तसे पाहिले गेले तर सार्वजनिक ठिकाणी जांभई देणे चांगले मानले जात नाही. परंतु आता या क्षणी ही बातमी वाचताना तुम्ही छोटासा प्रयोग करून पाहा. तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती तुमच्याकडे बघत असेल तर जांभई द्या आणि पाहा की तोदेखील जांभई देतो का?त्याने जर जांभई दिली तर त्याला तुमच्या विषयी सहानुभूती आहे, असे मानण्यास काही हरकत नाही. यासंबंधी झालेल्या अनेक संशोधनातून जांभई आणि सहानुभूतीची भावाना यांचा परस्पर संबंध समोर आला आहे.दुसऱ्याने जांभई दिल्यावर तुम्हाला जांभई येण्याला जांभईचा संसर्ग’ म्हणतात. आॅटिझम किंवा मानसिक संतुलन बिघाडलेले लोकांसमोर तुम्ही जांभई दिली तर ते जांभई देत नाही. उलट तुमच्या कुटुंबातील सदस्यांना लगेच जांभईचा संसर्ग होतो.याचाच अर्थ की, भावनिकरित्या तुमच्याशी अधिक जवळ असणाऱ्या लोकांना हा जांभईचा संसर्ग होतो. अभ्यासातून असेदेखील दिसूना आले की, अनोळखी व्यक्तींना तुम्ही जांभई दिल्यावर जांभई येण्याची शक्यता फार कमी असते.महिलांमध्ये इतरांकरिता पुरुषांपेक्षा जास्त सहानुभूती वाटत असते. म्हणून तर महिला समोर तुम्ही जांभई दिल्यावर त्यांनादेखील जांभई येते. साधरणत: वयाच्या चार ते पाचव्या वर्षांपासून मानवात सहानुभूतीची भावना निर्माण होते.