शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

एलईडी, एलसीडी टीव्ही घराची शान वाढवतात. पण टीव्हीच्या शानचं काय? त्यासाठी वाचा या 12 युक्त्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2017 6:05 PM

एलसीडी, एलईडी टीव्ही हॉल, बेडरुमची शान वाढवताहेत. पण त्यांची शान पण वाढवायला नको का?

 

- सारिका पूरकर-गुजराथी 

 

पूर्वी टीव्ही असलेलं त्यातही रंगीत टीव्ही असलेलं घर म्हणजे श्रीमंताचं घर समजलं जात होतं. आता मात्र टीव्ही सगळ्यांच्याच घरातली गरजेची वस्तू बनू लागलाय. पूर्वी एका शटरमध्ये टीव्हीला बंदिस्त करुन ठेवलं जात होतं. जेणेकरुन येता-जाता त्याला कोणी हात लावून तो खराब करु नये. आता टीव्ही सर्वत्र खुलेआम लावले जातात. शिवाय जमाना आहे तो एलईडी, एलसीडी टीव्हीचा. हॉलमधील मोठ्या भिंतीवर मोठ्या आकारात हे टीव्ही आता होम थिएटरचा फिल देत आहेत. हे एलसीडी, एलईडी टीव्ही हॉल, बेडरुमची शान वाढवताहेत. पण त्यांची शान पण वाढवायला नको का? त्यासाठीच एलसीडी, एलईडी लावलेल्या ओक्याबोक्या भिंतीला डेकोरेट केलं तर? टीव्हीची भिंतही खूपच बोलकी होईल!

 

               

टीव्हीमागील भिंती सजवताना..

१) टीव्हीमागील भिंतीवर तुम्ही फोटोजचा कोलाज साकारु शकता. यात फॅमिली फोटोज, निसर्ग देखावे, काही सुंदर विचार यांचा समावेश करता येईल. शिवाय काही आकर्षक फेब्रिक फ्रेम करुन लावण्याचा ट्रेण्डही आहे तो देखील या कोलाजमध्ये ट्राय करता येईल.

२) टीव्हीच्या मागे त्याच्या आकारापेक्षा मोठे शेल्फ उभारा. हे शेल्फ लाकडी, काचेचे असू शकतात. या शेल्फवर फोटो, छोटे फ्लॉवर वासे, इनडोअर प्लान्ट्स, संग्रह केलेल्या विविध वस्तू आकर्षक पद्धतीनं सजवता येतील. यामुळे टीव्हीच्या प्लेन लूकवरुन नजर हटून या वस्तूंवर गेल्यामुळे डोळेही सुखावतात.

३) मिक्स मिडिया . अर्थात विविध वस्तू एकाच ठिकाणी सजविण्याचा प्रकार. तो तुम्ही टीव्हीमागील शेल्फवर, किंवा डेस्कटॉप टीव्ही असेल तर त्याच्या भोवतालच्या जागेवर ट्राय करु शकता. पुस्तकं, लॅम्पशेड्स, इनडोअर प्लान्ट डेस्कटॉपभोवती आणि मागील भिंतीवर विविध फ्रेम्स लावून मिक्स मिडियाचा हटके लूक मिळवता येतो. रचना फक्त सुंदर हवी. घेतल्या वस्तू आणि ठेवून दिल्या असं नको.

 

            

४) मध्यम आकारात टीव्ही डेस्कटॉपवर असेल तर मागील भिंतीवर तुम्ही फेब्रिक म्युरल बनवू शकता. आकर्षक रंगातील, प्रिंटचे फेब्रिक गोलाकार, ओवल आकारात फ्रेम करा अन्यथा प्लायवर चिकटवून घ्या. आणि या प्लायच्या तुकड्यांची रचना टीव्हीमागे करा. प्रसन्न लूक मिळेल. फ्लोरल, डॉट प्रिंटचे फेब्रिक शक्यतो घ्या.

५) टीव्ही भिंतीवर लावला असेल तर टीव्हीचंच रुपांतर सुंदर फ्रेममध्ये करता येईल. त्यासाठी टीव्हीच्या आकाराचीच फ्रेम बनवून टीव्हीभोवती फिट करा. ही फ्रेम बनवताना टिपिकल फोटो फ्रेमचे रंग नको. तर फिकट हिरवा, आकाशी, निआॅन अशा रंगात फ्रेम बनवा. टीव्हीफ्रेम भिंतीवर शोेभून दिसेल.

६) सध्या टीव्ही कम उंचीच्या डेस्कवर ठेवून त्यामागे शेल्फ उभारण्याचा ट्रेण्ड लोकप्रिय होतोय. या शेल्फवर तुम्ही पुस्तकं, लॅम्पशेड्स, फोटोज मांडू शकता. डेस्कची उंची स्टॅण्डर्ड बेडसाईजच्या उंचीची (१६ इंच) हवी.

७) कमी उंचीच्या डेस्कटॉप टीव्हीमागील भिंतीवर षटकोनी शेल्फची साखळी आकर्षक रचनेत साकारा. यात तुम्ही कॅण्डल्स, तुमच्या मुलांना मिळालेल्या ट्रॉफीजची मांडणी करु शकता.

८) अगदी सोपी-सुटसुटीत सजावट हवी असेल तर टीव्हीमागील भिंतीवर पाना-फुलांचं डिझाईन असलेला वॉलपेपर लावा.

९) डेस्कटॉप टीव्हीभोवती, वरील भिंतीवर, शेल्फवर, डेस्कवर तुमच्याकडील पुस्तकांची रचना करता येईल. लायब्ररीचा वेगळा लूकही मिळेल आणि टीव्हीच्या भिंतीलाही थोडा सिरियसनेस मिळेल.

 

                  

१०) तीन भागातही ही टीव्ही सजावट करता येते. खाली डेस्क बनवा, नंतर टीव्ही लावायला पॅनल आणि त्यावर एक अजून पॅनल (जो प्लेन प्लायचा तुकडा असेल). खालच्या डेस्कवर काही छोटी शिल्पं, कॅण्डल्स ठेवता येतील. मधल्या टीव्हीचा पॅनल असा बनवा की मध्ये टीव्ही आणि टीव्हीच्या डावी उजवीकडे दोन खिडक्यांचा लूक मिळेल. यात तुम्ही आकर्षक पॉट्स ठेवू शकता. वरच्या प्लेन पॅनल (जो माळ्यासारखा असेल) असेल त्यावर फोटोज, स्पिकर्स ठेवता येतील.

११) व्हिण्टेज लूक हवा असेल जुन्या लाकडी फळ्यांचे पॅनल टीव्हीमागे बनवा. त्यावर टीव्ही लावा.

१२) दरवेळेस टीव्हीमागेच सजावट नको असेल तर भिंतीवर टीव्हीशेजारील मोकळ्या जागेवरही सजावट करता येते.