शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

'या' सेलिब्रिटींच्या लग्नाच्या कपड्यांच्या खर्चात मुंबईत घेता येईल 2BHK

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 8:15 PM

2018 हे वर्ष गाजलेल्या चित्रपटांपेक्षा बॉलिवुड सेलिब्रिटींच्या लग्नसमरंभांसाठी ओळखलं जाईल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वात आधी अनुष्का, त्यानंतर सोनम, नेहा धूपिया आणि आता दीपिका आणि रणवीर.

2018 हे वर्ष गाजलेल्या चित्रपटांपेक्षा बॉलिवुड सेलिब्रिटींच्या लग्नसमरंभांसाठी ओळखलं जाईल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्वात आधी अनुष्का, त्यानंतर सोनम, नेहा धूपिया आणि आता दीपिका आणि रणवीर. एकापाठोपाठ एक अशा तगड्या सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्याच्या चर्चा जेवढ्या रंगल्या त्यापेक्षा जास्त त्यांच्या लग्नामधील ब्राइडल लूकबाबत फॅन्समध्ये फार चर्चा होत होत्या. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या ब्राइडल ड्रेसच्या किमतींबाबत. पण जरा सांभाळून हा.... कारण या किमती ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल...

बॉलिवूडच्या मस्तानीचा नववधू साज 

दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांचा विवाहसोहळा दोन पद्धतींनी पार पडला. एक म्हणजे कोंकणी पद्धत आणि दूसरी म्हणजे सिंधी पद्धत. आपल्या सिंधी पद्धतीने होणाऱ्या विवाहसोहळ्यासाठी दीपिकाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. हा लेहेंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केलेला होता. या लेहेंग्याची किंमत 9 लाख रूपये होती. तसेच यावेळी दीपिकाने जे दागिने परिधान केले होते त्यांची किंमत 1 कोटी रूपयांपेक्षाही जास्त होती. दीपिकाचं मंगळसुत्र 20 लाख रूपयांचं होतं. 

फॅशन क्वीन सोनम कपूरचा ब्राइडल लेहेंगा

मे 2018मध्ये आनंद आहूजासोबत मुंबईमध्ये आपली लग्नगाठ बांधणाऱ्या सोनम कपूरच्या लग्नाचा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर अनुराधा वकीलने डिझाइन केला होता. सोनमच्या लाल रंगाच्या या लेहेंग्यावर गोल्डन कलरने सुंदर वर्क केलं होतं. या लेहेंग्याची किंमत 70 ते 90 लाख रूपये होती. 

अनुष्काचा पिंक लेहेंगा

दीपिका आणि अनुष्काच्या लग्नामध्ये अनेक गोष्टी कॉमन होत्या. एकतर दोघींनीही इटलीमध्ये लग्न केलं आणि दोघींनीही आपल्या लग्नामध्ये परिधान केलेले ड्रेस प्रसिद्ध डिझायनर सब्या साची यांनी डिझाइन केले होते. अनुष्काच्या पिंक कलरच्या ब्राइडल लेहेंग्याची किंमत 30 लाख रूपये होती. 

योगा क्विनचा ब्राइडल लूक

बॉलिवूडची सर्वात फिट आणि योगा क्विन शिल्पा शेट्टीने बिजनेसमन राज कुंद्रासोबत आपली लग्नगाठ बांधली. आपल्या लग्नासाठी शिल्पाने प्रसिद्ध डिझायनर तरुण तहिलियानी यांची निवड केली होती. शिल्पाने आपल्या लग्नात लेहेंगा नाही तर साडी नेसली होती. ज्यावर 8 हाजारपेक्षाही जास्त  Swarovski क्रिस्टल्सने वर्क करण्यात आलं होतं. या साडीची किंमत 50 लाख रूपये होती. 

ऐश्वर्याचा गोल्डन आउटफिट ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली. परंतु हे कपल आजही इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय कपल आहे. ऐश्वर्याने आपलं ब्राइडल आउटफिट प्रसिद्ध डिझायनर नीता लूलाकडून डिझाइन करून घेतलं होतं. ऐश्वर्याच्या या आउटफिटची किंमत 75 लाख रूपये होती. 

टॅग्स :fashionफॅशनbollywoodबॉलिवूडDeepveerदीप- वीरDeepika Padukoneदीपिका पादुकोणVirushkaविरूष्काSonam Kapoorसोनम कपूरShilpa Shettyशिल्पा शेट्टीAishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चन