- मोहिनी घारपुरे-देशमुखपारंपरिक आणि आधुनिक असा दोन्हीचा मिलाफ कोणत्या पोषाखात दिसत असेल तर तो म्हणजे अनारकली पॅटर्नचा ड्रेस. लहानांपासूण मोठ्यांपर्यंत कित्येकींना काही खास प्रसंगी हा अनारकली पॅटर्नच हवा असतो.तुमच्या घरंच वातावरण जर थोडं पारंपरिक असेल आणि तरीही तुम्हाला थोडंस स्मार्ट दिसायला आवडत असेल तर तुमच्यासाठी स्टाईल स्टेटमेण्ट म्हणून तुम्ही या अनारकली ड्रेसेसकडे पहायला हरकत नाही. किंबहुना हेच ड्रेसेस तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल.
छातीपर्यंत एकदम मापात, व्यवस्थित फिटींगचा आणि त्याखाली साधारण गुडघ्यापर्यंत उंचीचा मोठा घेर असलेला हा ड्रेस आणि त्याखाली चुरीदार हा एकूणच पेहराव खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतो.
अलिकडे तर अनारकली पॅटर्नमध्ये प्रचंड प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. तुमच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाला साजेसा लुक हा अनारकली पॅटर्न देतो. हा अनारकली ड्रेस परिधान करणं म्हणजे तुम्ही कलासक्त, बुद्धीमान, चौकस आणि सौंदर्याच्या भोक्त्या आहेत असं समजतं.
अनारकली पॅटर्नवर पारंपरिक पद्धतीचे कानाताले जसे झुबे, मोराचे कान वगैरे घातले आणि थोड्याशा गोल्डन, सिल्व्हर किंवा मोतीकाम वगैरे केलेल्या थोड्याशाच उंच टाचांच्या चपला घातल्यात तर या पॅटर्नवरचा लूक कम्पलीट होतो. ग्रेसफुल लूक हवा असेल तर अनारकली पॅटर्नशिवाय दुसरा पर्याय नाही.अनारकली पॅटर्नचा ड्रेस हा खरंच अनारकलीच्याच स्टाईलवरून बनवला गेला असावा असं वाटतं.
विशेषत: मध्यम देहयष्टीच्या मुलींनी फॅशनचा एक उत्तम पर्याय म्हणून या प्रकारच्या पोषाखाकडे पाहिलं पाहिजे. फार बारीक किंवा फार जाड्या मुलींवर मात्र अनारकली फार खुलेलच असं ठामपणे सांगू शकत नाही.
हल्ली अनारकली ड्रेसेसवर भरगच्च जरीकाम केलेलं असतं. त्यावर नेटच्या ओढण्या, सोनेरी चंदेरी वर्क आणि त्या ड्रेसेसचा एक वेगळाच फॉल यामुळे मात्र अनारकली नेहेमीच भाव खाऊन जातो यात शंका नाही..