प्रथमच नोकरी शोधताय !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2016 4:35 PM
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या करिअरला सुरुवात करण्यासाठी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतो.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या करिअरला सुरुवात करण्यासाठी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतो. मात्र बऱ्याचदा आपला रिज्यूम प्रभावी असूनही अनुभवाअभावी नोकरी मिळत नाही. यासाठी प्रथम नोकरी शोधताना काय काळजी घ्यावी याबाबत घेतलेला आढावा. आपण जेव्हा एखाद्या नोकरीसाठी मुलाखतीला सामोरे जाता, त्यावेळी आपण आपले सामर्थ्य आणि कौशल्ये दर्शविणे महत्त्वाचे आहे. तुम्ही मिळणाऱ्या कामासाठी योग्य आहात, याबाबत नियोक्ताला खात्री पटणे आवश्यक आहे. तुम्ही कंपनीत सुधारणा करण्यासाठी तुमचे कौशल्य, ताकद आणि रुची वापरू शकता, हे दर्शवून द्या. आपण कशात वरचढ आहोत हे एकदा सापडले की, त्यानुसार आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या रिज्युममधील तुमचे शिक्षण आणि इतर गोष्टी कंपनीसाठी कशा उपयुक्त आहे ते पाहा. तसेच तुमचा इंडस्ट्री जनरल्स, नेटवर्किंग उपक्रम, प्रशिक्षण उपक्रमामध्ये समावेश असावा. कोणताही प्रमुख निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही उद्योगातील गाभ्याबद्दल आणि भविष्याबद्दल संशोधन करुन खात्री करणे आवश्यक आहे. इंडस्ट्री जनरल्स बघा, कंपनीची वेबसाईट पाहा, विभागानुसार आच्छादित लपलेले रोजगार शोधा. योग्य प्रकारच्या संशोधनाने तुम्हाला नोकरी शोधण्याच्या कामात मार्ग मिळेल.