लहान मुलांसोबत प्रेमाने वागा !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2016 2:26 PM
मुलांना प्रामणीक बोलण्याची सवय लावणे आवश्यक आहे
लहान मुले मातीच्या चिकलासारखे असतात. त्यांच्यावर जसे संस्कार केले जातात, तसे ते घडतात.. शाळेत जायला लागल्यानंतर ते जास्त वेळ घराबाहेर राहतात. व वेगवेगळ्या मुलांसोबत त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे ते चांगल्या व वाईट या दोन्हीही गोष्टी शिकत असतात. खोटे बोलणेही ते यामधून शिकतात. खासकरुन लहान मुले हे शिक्षा होईल, या भितीपोटी खोटे बोलतात. त्याकरिता त्यांना लहानपणापासूनच त्यांना सर्व गोष्टीबद्दल बोलण्याचे स्वातंत्र देणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट ही वाईट व चांगली कशी आहे, हे समजून सांगावे. त्यामुळे मुले हे तुमची प्रत्येक गोष्ट ऐकायला लागतील. ३ ते ७ वर्ष वयोगटातील मुले हे थोड्याफार प्रमाणात खोटे बोलतात.आई वडिल व शिक्षकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना आपण एखादे वचन दिले तर ते नक्की निभावणे आवश्यक आहे. आपण त्यांच्यावर विश्वास करतो असे त्यांना वाटणे आवश्यक आहे. त्यामुळे ते वाईट गोष्टीकडे वळणार नाहीत किंवा कोणतीही गोष्टी आपल्याला सांगण्याचा संकोच बाळगणार नाही. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ते तुमची परवानगी घेतील. व नेहमी प्रामाणीकपणे बोलतील. मुलांचे सर्वात पहिले गुरु हे आईवडिल असतात. ते जर खोटे बोलत असेल तर मुलांनाही त्यांचीच सवय लागते. आपण मुलांसमोर रोल मॉडल आहोत, हे आईवडिलांनी कधीही विसरु नये. एखाद्या परिस्थितीत खोटे बोलावे लागले तर त्यांना यामागचे कारण सांगावे. मुलांच्या प्रामाणीक बोलण्याचे व कामाचे कौतुक करावे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळते. काळानुसार आईवडिलांनी आपल्या मानसीकतेत बदल करणे आवश्यक आहे. पूर्वीसारखे मुलांना मारण्याचे दिवस राहिले नसून, उलट प्रेमाने त्यांना समजावून सांगावे.