शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मकरसंक्रातीला बनवा खास तिळाचे पदार्थ !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2017 6:19 PM

मकरसंक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण, दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रात येते. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो.

-रवीन्द्र मोरे मकरसंक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण, दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रात येते. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे. म्हणूनच ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ या शब्दात वरील आशयाचा अर्थ भरला आहे. मग अशा गोड प्रसंगी तिळाचे विविध पदार्थ खाल्ले नाही तर अपूर्णताच वाटेल. तिळाचे विविध खाद्यपदार्थतिळगूळ - भाजलेले तीळ, गूळ, शेंगदाण्याचा कूट एकत्र करून बनवले जाणारे तिळगूळ मकरसंक्रांतीला सर्वत्र उपलब्ध असतात. यामुळे शरीरात स्निग्धता वाढते. तसेच थंडीपासून बचाव होण्यास मदत होते.तिळाची चिक्की - तिळगूळाप्रमाणेच तिळाची चिक्की हा देखील एक हटके पर्याय आहे. थंडीच्या दिवसात सतत भूक लागते. अशावेळी काही अरबट-चरबट खाण्यापेक्षा तिळाची चिक्की खाणे हा आरोग्यदायी पर्याय ठरेल.कुरमुरा चिक्की - तिळाप्रमाणेच कुरमुरा चिक्की हा अवेळी लागणाऱ्या भुकेवरचा मस्त पर्याय आहे. वेट लॉसच्या मिशनवर असलेल्यांसाठी हा झटपट होणारा हेल्दी पर्याय आहे. गुळपोळी - पुरणपोळीप्रमाणे भासणारी गुळपोळी मकरसंक्रातीला प्रामुख्याने बनवली जाते. नेहमीच्या पुरणाऐवजी यामध्ये बेसन, तीळ, गुळ आणि दाण्यांचा कूट एकत्र करून सारण बनवले जाते.तेलपोळी - तेलपोळी बनवणे हे कौशल्याचे काम असते. बनवायला जितकी किचकट तितकी स्वादाला अप्रतिम. तेलपोळी पत्र्यावर पीठाऐवजी तेलाच्या सहाय्याने लाटली जाते. मग यंदा थोडा वेळ काढून तेलपोळी नक्की बनवून पहा.cnxoldfiles/strong>साखर किंवा गुळाच्या पाकामध्ये तीळ मिसळून लहान लहान रेवडी बनवल्या जातात. प्रसादामध्ये आढळणारी रेवडी हिवाळ्यात जेवल्यानंतर गोड खाण्याची इच्छा पुरी करण्यास मदत करू शकते.