मकरसंक्रातीच्या सुरक्षित पतंगोत्सवासाठी !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2017 6:13 PM
मकरसंक्रांत हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंदोत्सव असतो. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे पतंग उडविणे होय. पतंग उडविताना काळजी न घेतली गेल्यामुळे पक्षी तसेच लहान बालके आणि मोठ्या व्यक्तींनादेखील दुखापत झाल्याच्या घटना घडतात.
-रवीन्द्र मोरे मकरसंक्रांत हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंदोत्सव असतो. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे पतंग उडविणे होय. पतंग उडविताना काळजी न घेतली गेल्यामुळे पक्षी तसेच लहान बालके आणि मोठ्या व्यक्तींनादेखील दुखापत झाल्याच्या घटना घडतात. बऱ्याचदा पतंगाच्या मांज्यामुळे अपघातही घडले आहेत. त्यामुळे पतंगोत्सव साजरा करताना सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.काय काळजी घ्याल* बहुतेक उत्पादक पतंगाच्या मांज्यामध्ये काचेची पावडर वापरतात. त्यामुळे पक्ष्यांना तसेच हाताच्या बोटाला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुती मांजा वापरा. यामुळे अपघाताची शक्यता कमी होते.* आपल्या आनंदामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून पतंग उडविताना गर्दीच्या ठिकाणाऐवजी मोकळे मैदान तसेच कमी रहदारीचे ठिकाण निवडा. यामुळे अपघाताची शक्यता कमी होईल तसेच तुम्हांलाही पतंग उडवण्याचा आनंद घेता येईल.* इलेक्ट्रीक पोलजवळ तसेच विद्युत तारांजवळ पतंग उडवणे टाळा. तसेच यामध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी धडपड करू नका. असे केल्यास विद्युत शॉक लागून मोठा अपघात होऊ शकतो. * पतंग उडविताना उन्हापासूनही स्वत:चे संरक्षण करावे. जास्तवेळ उन्हात राहिल्याने अतिनील किरणांमुळे डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून सनग्लास अवश्य वापरा.* मांज्यामधील काचेमुळे जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून बोटांमध्ये रबरचे सेफ्टी बॅन्ड घाला. तसेच फर्स्ट एड बॉक्स जवळ ठेवा.* मोटारसायकल चालकांनी मकरसंक्रांतीच्या काळात हेल्मेट आणि गळ्याभोवती स्कार्फ घालून स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा भरधाव बाईक चालवताना मांज्यामुळे इजा, अपघात होण्याचा धोका असतो.* बिल्डींगच्या टेरेसवर लहान मुलं पतंग उडवताना घरातील वडीलधाºयांनी त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे. पतंग उडवण्याच्या नादात अधिक उंचावर जाणे टाळा.* गजबजलेल्या शहरांमध्ये पतंग उडवण्याचा मोह होत असला तरीही रहदारीचा रस्ता टाळा. यामुळे अपघातांची शक्यता असते.