शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

मकर संक्राती स्पेशल : 'या' दिवशी का असतं काळ्या कपड्यांना महत्त्व?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 3:53 PM

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांती. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून सर्वांशी प्रेमान बोलून तिळगुळाने सर्वांच तोंड गोड करतात.

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांती. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून सर्वांशी प्रेमान बोलून तिळगुळाने सर्वांच तोंड गोड करतात. प्रत्येक वर्षाच्या 14 किंवा 15 जानेवारीला नित्य नेमाने मकर संक्रात येते. मकर संक्रात म्हणजे सुर्याचे उत्तरायण सुरु होणं. सुर्याचा मकर राशीत संक्रमण. भारत विविधतेने नटलेला देश आहे असे आपण नेहमीच ऐकतो. अशातच या सणाबाबतही भारतामध्ये विविधता दिसून येते. मकर संक्रातीचा दिवस संपूर्ण भारत खंडात वेगवेगळ्या नावाने साजरा करण्यात येतो. लोहडी, बिहु, पोंगल आणि अनेक नावं या सणाला दिलेली आहेत. 

महाराष्ट्रात या सणाला मकर संक्राती असं म्हणतात. हा सण एकूण तीन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी असते. दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किक्रांत साजरी केली जाते. या दिवशी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना दिसतात. सर्वांच्या घरी तिळाच्या लाडूंची रेलचेल असते. संक्रात साजरी करण्यामागील भौगोलिक कारण म्हणजे, सुर्याचा उत्तरेकडील प्रवास. या दिवशी उत्तरायणाला सुरुवात होते. तसेच हिवाळा कमी होऊन थंडीही कमी होते. तसेच दिवस मोठा होऊन रात्री छोटी होत जाते. या दिवशी काळ्या कपड्यांना फार महत्त्व असते. 

काळ्या कपड्यांचे महत्त्व

संक्रातीच्या दिवशी काळ्या कपड्यांना फार महत्त्व देण्यात येते. विशेषतः नववधू आणि लहान मुलं यांच्यासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी काळे कपडे परिधान करण्यामागे असं कारण सांगितलं जातं की, ही वस्त्र उष्णता शोषून घेऊन शरीराल उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे संक्रात जवळ आली की बाजारांमध्ये काळ्या साड्या आणि काळी झबली दिसू लागतात. 

नववधूंसाठी या सणाचे विशेष महत्त्व देण्यात येते. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रातीला नववधूसाठी खास काळ्या रंगाची साडी घेण्यात येते. तसेच तिला हलव्याचे दागिने परिधान करण्यास सांगितले जाते. या दिवशी हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावण्यात येतं. त्यांना तिळगुळ किंवा तिळाच्या वड्या दिल्या जातात. तसेच एखादी वस्तूही वाण म्हणून देण्यात येते. तसं पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीमध्ये काळ्या रंगाला अशुभ मानलं जातं. परंतु काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्राती होय. 

लहान मुलांचे 'बोर न्हाण'

संक्रातीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे 'बोर न्हाण' करण्यात येते. यावेळी एका पाटावर बाळाला बसवलं जातं. त्याच्याभोवती इतर लहान मुलांना बसवलं जातं. त्याला काळ झबलं, अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, हातात बासरी अशा अनेक प्रकारच्या दागिन्यांनी सजवलं जातं. त्याच्या डोक्यावरून कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या या सारख्या मुलांना आवडणार्‍या पदार्थांचा अभिषेक करण्यात येतो. 

पतंगोत्सव

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचीही प्रथा आहे. यामागील उद्दीष्ट म्हणजे, सामान्यपणे पतंग उडवण्यासाठी घराच्या छतावर किंवा मैदानामध्ये जातो. त्यामुळे कोवळ्या उन्हामध्ये जाता येते.  

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीBeauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स