बॉससोबत चांगले संबंध तयार करण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2016 3:05 AM
आॅफिसमध्ये आपल्या बॉससोबत संबंध हे चांगले राहणे खूप महत्वाच ेआहे.
आपले संबंध चांगले नसेल तर काम करणे अवघड होऊ शकतो. याकरिता चांगले संबंध तयार करावेत. त्याकरिता वेळेवर आपले काम पूर्ण करावे. बॉसला आपण आपले काम हे वेळेवेर संपवितो हे वाटले पाहीजे. एखाद्यावेळेला आपल्याला जादा काम दिले असेल तर ते सुद्धा पूर्ण जबाबदारीने करावे.स्वभाव ओळखा : काही बॉस हे केवळ आपला मतलब असणारी माहिती घेतात. तर काहींना छोट्या छोट्या गोष्टीही माहिती करुन घ्यावयाची असते. मित्र व क टुंबासारखेही काहीजण वागत असतात. तर काही प्रोफेशनली वागतात. याकरिता आपण आपले बॉस कोणत्या स्वभावाचे आहेत. त्यानुसार त्यांच्याशी संबंध तयार करावेत.कामाला नकार नको : आपल्याला दिलेले कोणतेही काम करण्यासाठी नकार देण्याची कधीही चूक करू नका. आपण कामापासून बचाव करीत आहेत, हे बॉसला वाटायला नको. ते काम जर आपल्या क्षेत्रात येत नसेल किंवा त्यामुळे आपण नाराज असाल तर एकटे जाऊन बॉससोबत बोलावे. त्यांनी जर ते काम तुम्हालाच करावे लागेल असे सांगितले तर ते करावे अन्यथा दुसरीकडे नोकरी शोधावी.बॉसची आवड ओळखा : आपल्या बॉसला ईमेल,फोन कॉल व मीटींग यापैकी बोलण्यासाठी कोणती पद्धत आवडते. हे अगोदर ओळखायला शिकले पाहीजे. तुम्ही जर थेट त्यांच्या कॅबिनमध्ये गेला तर त्यांचे लक्ष हे विचलीत होऊ शकते.कारणे सांगू नका : आपल्याला दिलेले काम पूर्ण झालेले नसेल तर कोणतीही कारणे बॉसला सांगू नका. कारण की, कारणे ऐकून घेणे हे कोणत्याही बॉसला अजिंबात आवडत नाही. त्याकरिता कारणे सांगणे टाळावे. आपल्याला दिलेल काम हे पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपली असते. ते जर पूर्ण झाले नाहीतर ती आपली चूक आहे. यामध्ये कोणतेही कारणे सांगू नका, त्यामुळे बॉसचा मूड खराब होऊ शकतो.चांगले काम करा : बॉससोबत संबंध राहण्यासाठी दिलेले काम हे चांगल्याप्रकारे करण्याची सवय करा.फीडबक घ्यावा : आपण करीत असलेल्या कामासंबंधी आपल्या बॉसकडून फिडबक मागून घ्यावा. ज्यादाकरुन बॉस स्वत: फीडबक देत असतात. परंतु, त्यांनी जर दिला नसेल तर त्यांच्याकडून तो मागावून घ्यावा. त्यामुळे आपल्या कामामध्ये आपल्याला सुधारणा करता येते.प्रत्येक गोष्ट शेअर करु नका : आपला बॉस आपल्यासोबत हसून बोलत असेल तर आपण त्यांना बेस्ट फें्रड बनवावे. परंतु, आपली प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करु नका. बॉससोबत कधीही अंतर राखलेलेच योग्य असते.सुटीची अगोदर महिती द्या : आपल्याला सुटीवर जायाचे असेल तर बॉसला अगोदरच त्याची माहिती द्यावी. चार दिवसाचे सुटीवर आपण जात आहोत व एक दिवस अगोदर बॉसला आपण सांगितले तर ते बरोबर नाही. अगोदरच सांगितले तर आपल्या कामाची इतरांना विभागणी करुन दिली जाते.