पवित्रा कस्तुरे
नेलपेण्ट लावणं हे काही फार सेन्सेशनल नाही. काहीजणी रोज लावतात, काहीजणी नाही. काहींना लाऊड कलर्स आवडतात तर काहींना न्यूड, फेण्ट कलर्स. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की या पावसाळ्यात अग्ली कलर्सचीच जास्त क्रेझ असेल तर? कदाचित थोडा धक्का बसेल. पण ते खरं आहे. कारण पावसाळ्यात वातावरणात सगळा ग्रे कलर भरुन असतो, कुठं कुठं हिरवे पॅच दिसतात. पण तेवढेच. बाकी सूर्यप्रकाश नाही. कुंद हवा. अशा सगळ्या कुंद हवेत आपण आपल्या जगण्यातल्या रंगांनी जरा ब्राईट वातावरण तयार करू शकतो. पण रोज उठून आॅफिसला ब्राइट कलर्स घालून कसं जाणार? अतीच लाऊड दिसतं ते. त्यात फॉर्मल्समध्ये अतीब्राइट कलर्स फार मिळणंही मुश्किल. मग उपाय काय तर नेलपेण्ट. म्हणजे काय तर आपण आपल्या हातांच्या दहा बोटावर काही देखणे, ब्राईट कलर्स मिरवू शकतो.
त्यासाठी सध्या चर्चेत असणारे आणि पावसाळ्यात भन्नाट दिसणारे अनेक कलर्स आहेत. पूर्वीसारखी दहाही नखांना एकच रंग लावायची गरजही उरलेली नाही. एकाच बोटावर दोन कॉण्ट्रास्ट रंग लावता येतात. किंवा प्रत्येक नखालाही वेगळा ब्राईट रंग लावता येवूच शकतो. तर असे रंग तुम्ही लावणार असाल तर त्यासाठी घ्या या काही रंगांची यादी. ते रंग तुम्ही प्लेन लावू शकता. त्यानं नखांवर नक्षी काढू शकता. फुलं, पानं, तारे काढू शकता. किंवा प्लेन कलर्सवर लाइन्स करु शकता. काय वाट्टेल ते करता येवू शकतं. फक्त जरा आयडिया वापरायला हव्यात.त्यासाठीचे रंग कुठले?* अग्ली नेल कलर्स सध्या चर्चेत आहेत. म्हणजे इतके दिवस ज्या रंगाना भयंकर ठरवलं गेलं ते रंग. काळे, डार्क ब्राऊन, कॉफी , लाल रंगाच्या भडक छटा, जांभळ्याच्या काही छटा पूर्वी मुली वापरत नसत. आता तसं नाही. हे रंग तुम्ही बिन्धास्त वापरू शकता.
* न्यूड. म्हणजे नखांच्या रंगाची नेलपेण्ट लावून त्यावर डार्क रंगांनी नक्षी काढू शकता.* आॅरेंज. या रंगाच्या सर्व छटा पावसाळ्यात वापरता येतात.* पिंक आणि पर्पल या दोन्हींच्या मधल्या शेडसही सध्या चर्चेत आहेत.* फक्त जांभळा आणि फक्त हिरवा रंगही नखांवर छान दिसतो. ब्राईट दिसतात हातही.