एकाच रिपोर्टमध्ये करा अनेक ट्विट्स रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 5:12 PM
एकाच रिपोर्टमध्ये एकापेक्षा जास्त ट्विट्स जोडून रिपोर्ट केला जाऊ शकतो.
मायक्रोब्लॉगिंग सोशल साईट ट्विटरबद्दल ‘छोटा पॅक बडा धमाका’ असेच म्हणावे लागेल. केवळ 140 शब्दात आपले मत मांडताना ट्विटरवर वादच जास्त होतात. त्याबरोबरच अनेक अश्लील व समाजात वितुष्ट निर्माण करणारे ट्विट केले जातात.अशा उपद्रवी लोकांचे ट्विटर अकाऊंट ‘रिपोर्ट’ म्हणजेच तक्रार करण्याची सोय ट्विटरवर आधीपासून आहे. पण त्यात एक नवीन अपडेट करण्यात आले आहे.यापुढे एकाच रिपोर्टमध्ये एकापेक्षा जास्त ट्विट्स जोडून रिपोर्ट केला जाऊ शकतो. यामुळे एकाहून अधिक ट्विटसची तक्रार करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार आहे.हाओ टँग यांनी माहिती दिली की, या अपडेटमुळे तक्रार नोंदणीसाठी लागणारा वेळ खूप कमी होणार आहे. ट्विटरवर होणाºया खोडसाळपणाला यामुळे नक्कीच आळा बसेल.सुरक्षा आणि संवेदनशीलतेला कंपनी सर्वोच्च प्राधान्य देते. ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करताना यूजरला सुरक्षित वाटले पाहिजे यासाठी कंपनी सर्वोतोपरी प्रयत्न करते. जर कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याची सूचना तत्काळ कंपनीच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे नवीन अपडेट आम्ही देत आहोत, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.आयओएस, अँड्रॉईड आणि वेबसाईट अशा तीन्ही प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. नुकतेच ट्विटरने दहशतवाद पसरविणाºया संदेशांवर बंदी घालण्यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत.