पुरुष बहुल आॅफिस कल्चर असते महिलांसाठी तापदायक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2016 2:52 PM
नकारात्म वातावरणात काम करताना पुरुष असो वा महिला दोघांनाही तणाव जाणवतो.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करणार्या महिलांना अशा पुरुषप्रधान किंवा पुरुष बहुल कार्यालयात काम करताना अधिक तणावाला सामोरे जावे लागते हे सत्य आहे. मात्र त्याचे कारण जे गृहित धरले जाते की, ‘महिलांचा तसा स्वभावच असतो’ हे नाही तर कामाच्या ठिकाणी असणारी प्रतिकूल परिस्थिती हे आहे.एका संशोधनात असे आढळून आले की, नकारात्मक वातावरणात काम करताना पुरुष असो वा महिला दोघांनाही तणाव जाणवतो. अशावेळी महिलांमध्ये जे तणाव दर्शवणारे शारीरिक लक्षणे दिसून येतात त्याचपद्धतीचे लक्षणे पुरुषांमध्येही आढळतात. म्हणजे महिला या मुळातच अतिसंवेदनशील असल्यामुळे त्यांना पुरुषप्रधान आॅफिस वा काम करताना अधिक तणाव जाणवतो अशी कारणीमीमांसा करणे चुकीचे ठरते, असे या संशोधनाच्या लेखिका आणि इंडियाना विद्यापीठातील सहायक प्राध्यापक केट टेलर यांनी सांगितले.आपल्याला सामावून घेतले न जाण्याची भावना या तणावामागचे प्रमुख कारण असते. संशोधनामध्ये केलेल्या प्रयोगात एका महिला स्वयंसेकिेला तीन पुरुषांच्या गटासोबत तर एका पुरुषाला तीन महिलांच्या गटासोबत काम करण्यास सांगण्यात आले. दोन्ही गटातील सदस्यांना त्या स्वयंसेवक/सेविकेला एकाकी पाडण्याची स्पष्ट सुचना देण्यात आली होती.प्रयोगाच्या विविध टप्प्यावर स्वयंसेवकांच्या लाळेतील कोर्टिसोल हार्मोनची पातळी मोजून तणाव प्रतिसाद नोंदविले जायचे. त्यातून असे दिसून आले, पुरुष आणि महिला स्वंयेसेवकांमध्ये तणावाची तीव्रता सारखीच होती. ‘अमेरिकन जर्नल आॅफ सोशिओलॉजी’मध्ये हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला.