मार्कची अशीही इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:08 AM
मार्कची अशीही इच्छागायक मार्क ए एथंनी हे अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या जनकल्याणकारी कतृत्त्वाबाबत त्यांचा यथोचित सन्मान करू इच्छित आहेत.
मार्कची अशीही इच्छागायक मार्क ए एथंनी हे अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या जनकल्याणकारी कतृत्त्वाबाबत त्यांचा यथोचित सन्मान करू इच्छित आहेत. पुढच्या वर्षी १६ फेब्रुवारी रोजी एंथनी 'द माईस्ट्रो केयर्स फाऊंडेशन'तर्फे '२0१६ ग्लोबल ह्युमॅनिटेरीयन अवॉर्ड' हा पुरस्कार देवून ते क्लिंटन यांचा सत्कार करणार आहेत. याबाबत एंथनी सांगतात, क्लिंटन यांनी दिलेल्या योगदानाचा उत्सव साजरा करणे आम्ही आमचे भाग्य समजतो. एंथनी यांनी डेमोक्रॉटिक पक्षाची राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना याअगोदरच पांठिबा जाहिर केला आहे.क्रिसमस सेलिब्रेशनहॉलिवूड सुपरस्टार सूसन सैरेंडन हीर सिरियाच्या शरणार्थींसोबत लेस्बोसमध्ये क्रिसमस साजरा करणार आहे. सूसनने नुकतीच युद्धग्रस्त देशातून बाहेर पडलेल्या शरणार्थींची भेट घेण्यासाठी यूनानी द्विपचा दौरा केला. याबाबत सूसन सांगते की, युद्धग्रस्त देशातील अत्याचाराला बळी पडलेल्या शरणार्थींचा स्वीकार करणे हे जगासमोरचे मोठे आव्हान आहे. मात्र मानवतेच्या दृष्टिकोनातून याबाबत जनजागृती व्हायला हवी.सोफिया रीसची गट्टीविनोदी चित्रपट 'हॉट पर्सूट'च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री रीस विदरस्पुन आणि कोलंबियाई अभिनेत्री सोफिया वेर्गारा यांच्यात चांगलीच दोस्ती झाली आहे. रीस सांगते, माझ्या हृदयात सोफियाप्रती प्रचंड सन्मान आहे. तसेच मला पक्के ध्येय आणि मजबुत विचारांच्या महिलांशी दोस्ती करायला नेहमीच आवडते. दक्षिणेत मी अशाच दृढ निश्चियी महिलांच्या सहवासात वाढले असून, सोफिया अगदी तशीच आहे.