हुशार मुलांना डेट करणाऱ्या मुली गणितात कच्च्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2016 8:37 PM
संशोधनातून जोडीदाराची हुशारी आणि मुलींचा तांत्रिक विषयांचा कल यांचा संबंध प्रथमच उजागर झाला.
ज्या मुलींना गणित किंवा विज्ञानातील तांत्रिक गोष्टी अवघड वाटत असेल त्यांनी त्यासाठी आपल्या जोडीदाराला दोष द्यावा. कारण एका रिसर्चमध्ये, आपल्यापेक्षा जास्त हुशार आणि स्मार्ट मुलांना डेट करणाऱ्या मुलींमध्ये गणित आणि विज्ञानाबद्दल भीती दिसून आली.या संशोधनातून जोडीदाराची हुशारी आणि मुलींचा तांत्रिक विषयांचा कल यांचा संबंध प्रथमच उजागर झाला.अमेरिकेलीत बफलो विद्यापीठातील प्रमुख संशोधन लोरा पार्क यांनी सांगितले की, ज्या मुलींचे जोडीदार खूप हुशार असतात, त्यांचा गणिताविषयी कल कमी होतो. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) या क्षेत्रांत त्यांची अभिरूची नसते.पण याचा अर्थ असा नाही की, हे सर्वच मुलींबाबत खरे आहे.900 मुलींनी या संशोधनात सहभाग नोंदवला होता. ज्यामुली अधिक हुशार पुरुषांला पसंती देतात त्या पारंपरिक भूमिका (उदा. गृहणी) पार पाडण्यात समाधान मानतात.विशेष म्हणजे ज्या मुली जोडीदाराविषयी असे प्राधान्य ठेवत नाही त्या तांत्रिकबाबतीत आणि गणितामध्ये चांगली प्रगती करतात.याविषयीचा अहवाल 'जर्नल आॅफ अप्लाईड सोशल सायकोलॉजी'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.