सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू असून प्रत्येकजण त्यासाठी तयारी करताना दिसत आहे. अशातच ट्रेडिसनल लूकसाठी फक्त मुलीच नाही तर मुलही क्रेझी असतात. मुलींसाठी ट्रेडिशनल कपड्यांमध्ये फार वरायटी मिळते. तेच मुलांसाठी यामध्ये लिमिटेड ऑप्शन असतात. त्यामुळे अनेक मुलं कुर्ता वेअर करणं पसंत करतात. परंतु, योग्य कुर्ता सिलेक्ट करणं फार अवघड असतं. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुमच्यासाठी फार उपयोगी ठरू शकतात.
स्टाइल
तुम्ही कुर्ता घेण्यासाठी कोणत्याही दुकानात गेलात तर तिथे तुम्हाला दोन स्टाइल्स अवेलेबल आहेत. मॉर्डन कुर्ते आणि ट्रेडिशनल कुर्ते. ट्रेडिशनल कुर्ता सिंम्पल कटमध्ये असतो. वेडिंगसाठी डिझायनर कुर्त्यांमध्ये जास्त वर्क असतं. जास्त बारिक असणाऱ्या किंवा जास्त वजन असणाऱ्या सगळ्या लोकांसाठी हा कुर्ता बेस्ट ऑप्शन ठरतो.
कुर्त्यांमध्ये अनेक प्रकारचे स्टाइल्स येतात. यांचे कट्स आधीपासूनच सिंम्पल असतात. तसेच या कुर्त्यांचे कट्स वेगवेगळे असतात.मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन्समध्ये मॉर्डन कुर्ते आढळून येतात. तुम्ही भारतातील फेमस डिझायनर्सच्या डिझाइन्स फॉलो करू शकता.
मटेरिअल
मार्केटमध्ये विविध प्रकारच्या मटेरियलमध्ये कुर्ते उपलब्ध असतात. ज्यामध्ये शिफॉन, कॉटन आणि सिल्कच्या कुर्त्यांचाही समावेश आहे. कपड्यानुसारच त्यावर वर्क करण्यात येतं. तसं पाहायला गेलं तर सिल्क आणि खादीच्या कुर्त्यांची खास गोष्ट म्हणजे, याचा प्लेन टेक्चरही फार अट्रॅक्टिव्ह वाटतो. गरज असेल तर तुम्ही हे नेहरू किंवा इतर जॅकेटसोबत मॅच करू शकता.
रंग
वेडिंगसाठी कुर्ता घेत असाल तर प्रयत्न करा की, थोड्या ब्राइट कलर्स निवडाल. जर कुर्त्यावर वर्क केलेलं असेल तर तुम्ही ऑफ व्हाइट किंवा इतर लाइट कलरही निवडू शकता. तेच जर तुम्ही ब्राइट कलर निवडणार असाल तर कुर्त्यासोबत कॉन्ट्रास्ट किंवा वर्क असणारं जॅकेट निवडू शकता. हे जॅकेट तुम्हाला परफेक्ट लूक देण्यासाठी मदत करेल.