सध्या बराक ओबामा आणि मिशेल ओबामा आपल्या सुट्या एन्जॉय करता आहेत. त्यातलाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. तो फोटो आहे मिशेल ओबामा यांचा. फोटोतल्या मिशेल ओळखता येणार नाही इतक्या वेगळ्या दिसता आहेत. त्यांची नॅचरल हेअर स्टाइल हेच त्यांच्या वेगळेपणाचं कारण ठरली आहे. एकदा का सत्ता गेली की त्यावरची माणसंही मग चर्चेतून बाहेर पडायला लागतात. हे फक्त भारतातच घडतं असं नाही. अमेरिकेतही तसंच आहे. पण नियमाला अपवाद असतात. आणि हा अपवाद अर्थातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अमेरिकेची माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांचा आहे. कारण 20 जानेवारी 2017 पासून बराक ओबामा सत्तेवरून पायउतार झाले. पाय उतार झाल्यक्षणापासून त्यांनी सामान्य माणसासारखं जगायला सुरूवात केली. आठ वर्षापूर्वी जसं आयुष्य होतं तसं त्यांनी जगायचं ठरवलं. प्रसिध्दी झोतापासून खूपच लांब राहायचं ठरवलं. पण ते त्यांनी ठरवलं. पण अमेरिकेतल्या आणि अमेरिकाबाहेरच्या लोकांची मात्र या दोघांविषयीची उत्सुकता अजूनही शमली नाही. ते काय करतात, कुठे राहतात याबद्दल लोकांना अजूनही जाणून घ्यायचं आहे. त्याबद्द्ल थोडंही काही वाचायला आणि पाहायला भेटलं की मग त्यावर अजूनही चर्चा होता आहेत. सध्या बराक ओबामा आणि मिशेल ओबामा आपल्या सुट्या एन्जॉय करता आहेत. त्यातलाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. तो फोटो आहे मिशेल ओबामा यांचा. फोटोतल्या मिशेल ओळखता येणार नाही इतक्या वेगळ्या दिसता आहेत. त्यांच्या वेगळेपणाचं कारण म्हणजे त्यांनी केलेली नॅचरल हेअर स्टाइल. अमेरिकेची फर्स्ट लेडी म्हणून दिसण्याचे राहण्याचे काही एक नियम अर्थातच मिशेल ओबांमानाही होते. त्यामुळे गेल्या आठ वर्षापासून मिशेल ओबामा कायम मोकळ्या केसांच्या एका विशिष्ट स्टाइलमध्येच दिसायच्या. मिशेल यांची वर्षानुवर्षापासूनची हिच हेअर स्टाइल असावी असा समज जगातल्या अनेकांचा झाला. पण आता जेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीचे ते प्रमाणबद्ध नियम गळून पडले तेव्हा त्या आपल्या नॅचरल लाइफ स्टाइलमध्ये राहू लागल्या आहेत. समाज माध्यमावर व्हायरल झालेला त्यांच्या फोटोमध्ये मिशेल यांचे कुरळे कुरळे केस दिसता आहेत. केसांना त्यांनी राखाडी रंगाचा हेअर बॅण्ड लावला आहे आणि केसांची छोटी पोनी घातली आहे. या फोटोवर आतापर्यंत लाखो जणांनी ट्विट केलं आहे. कोणी म्हणतंय ‘गेल्या कित्येकवर्षांपासून मिशेल यांना या रूपात बघण्यासाठी मी आतूर झाले होते’. तर कोणी त्यांच्या या नॅचरल रूपाचं स्वागत करत आहे. तर एक सामान्य माणूस म्हणून जगताना मिशेल नॅचरल राहण्याचा आपला ‘विशेष हक्क’ बजावत आहे त्याचंही अनेकांनी कौतुक केलं आहे. अनेकांनी बराक आणि मिशेल ओबामा यांना त्यांच्या ‘नॅचरल’ आणि ‘सिम्पल’ जगण्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
मिशेल ओबामांच्या नॅचरल लूकला लाखोंची पसंती
By admin | Published: April 05, 2017 6:03 PM