बेरोजगारीमुळे होतात सर्वाधिक घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2016 2:41 PM
घटस्फोट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बेरोजगारी.
असं म्हणतात की, आजकाल नातेसंबंधांची वीण सैल झाली आहे. कधी एकेकाळी ‘घटस्फोट’ हा शब्द त्याज्य मानला जात असते. मात्र तो आज सर्रास आपल्या आजुबाजूला ऐकायला आणि पाहायला मिळतो. घटस्फोट होण्याचे सर्वात मोठे कारण कोणते याचा शोध घेण्यासाठी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, पती बेरोजगार आहे म्हणून सर्वाधिक घटस्फोट होतात.आधुनिक जीवनशैलीमध्ये कामाच्या व्यापातून आपल्या जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढते या प्रचतिल समजुतीला खोडणारे हे निष्कर्ष आहेत. हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अध्ययनातून समोर आले की, पतीच्या बेरोजगारीला कंटाळून अनेक महिला घटस्फोटाचा मार्ग स्वीकारतात.‘पॅनल स्टडी आॅफ इनकम डायनॅमिक्स’कडून मिळवण्यात आलेल्या ६३०० विवाहित जोडप्यांच्या माहितीचा संशोधकांनी अभ्यास केला. ही माहिती १९६८ ते २०१३ या कालखंडा दरम्यान गोळा करण्यात आली होती. विश्लेषणाअंती आढळून आले की, १९७५ नंतर जे पुरुष बेरोजगार आहेत त्यांचा घटस्फोट होण्याची शक्यता ३.३ टक्के असते. रोजगार असलेल्या पुरुषांपेक्षा ही शक्यता ०.८ टक्के जास्त आहे.