मुंजाळ कन्येचे हायप्रोफाईल लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:17 AM
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. राजधानी दिल्लीत मंगळवारी ज्येष्ठ उद्योगपती 'हिरोमोटो कॉर्प'चे अध्यक्ष पवन मुंजाळ यांची कन्या वसुधा हिचा विवाह निमंत्रित हायप्रोफाईल वर्हाडींच्या उपस्थितीत शाही थाटात पार पडला.
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. राजधानी दिल्लीत मंगळवारी ज्येष्ठ उद्योगपती 'हिरोमोटो कॉर्प'चे अध्यक्ष पवन मुंजाळ यांची कन्या वसुधा हिचा विवाह निमंत्रित हायप्रोफाईल वर्हाडींच्या उपस्थितीत शाही थाटात पार पडला. दिल्लीस्थित दिनोदिया कॅपिटल अँडव्हायझर्स फर्मचे कार्यकारी संचालक पंकज दिनोदिया यांच्याशी ती विवाहबद्ध झाली. अर्थात, मुंजाळ यांनी हा सोहळा साधेपणाने आणि निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडल्याचे सांगितले. तरीही, या सोहळ्याला उद्योगजगतातील व राजकारणातील बडी हस्ती तसेच नातेवाईक व जवळची मित्रमंडळी अशा दीड हजार मान्यवर प्रतिष्ठित लोकांची उपस्थिती होती. दिल्लीनजीकच्या मधुबन फार्म हाऊसमध्ये हा सोहळा पार पडला. तत्पूर्वी, १३ ऑक्टोबरला दिल्लीतील हयात रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलमध्ये मेंदीची रस्म (प्रथा) उत्साहात पार पडली, तर १२ ऑक्टोबरला फार्म हाऊसमध्ये संगीताचा कार्यक्रम झाला. ऑगस्ट महिन्यात दिल्लीतच एका शानदार समारंभात वसुधा व पंकज यांचा वाङ्निश्चय (साखरपुडा) झाला. पारंपरिक पंजाबी रीतिरिवाजानुसार तो झाला होता. प्रसिद्ध पॉपगायक मिकाने त्या वेळी पाहुण्या मंडळींचे मनोरंजन केले होते.नववधू वसुधा ही चाकोला या चॉकलेट ब्युटिक शॉपची मालकीण आहे. देशभरात या कंपनीची अनेक शॉप आहेत. साहजिकच वेलवेटच्या आकर्षक चॉकलेटच्या बॉक्समधून दिलेल्या निमंत्रणपत्रिकेपासून त्यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली होती. तर, पंकज हॉवर्ड स्कूल ऑफ बिझनेसचा एमबीए आहे. आर्थिक सल्ला व सेवा देणार्या या फर्मचा देशात चांगलाच नावलौकिक आहे.या खास शाही विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी उमर अब्दुल्ला, अरुण जेटली, सुनील मित्तल, बडी उद्योजक मंडळी, राजकीय नेतेमंडळींना निमंत्रण देण्यात आले होते.