शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

NATURE : भारतातील पर्वतरांगेचे सौंदर्य पाहण्यासाठी खास रेल्वेरूट्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 8:54 AM

उन्हाळा सुरू झाला असून सुट्यांमध्ये बहुतांश लोक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हिल्स स्टेशनची निवड करतात. मात्र बऱ्याचजणांना कोणत्या ठिकाणी कसे जायायचे म्हणजे कोणता मार्ग सोयीस्कर असेल शिवाय नैसर्गिक सौंदर्याचा आनंदही घेता यावा, याबाबत माहित नसते.

-Ravindra Moreउन्हाळा सुरू झाला असून सुट्यांमध्ये बहुतांश लोक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हिल्स स्टेशनची निवड करतात. मात्र बऱ्याचजणांना कोणत्या ठिकाणी कसे जायायचे म्हणजे कोणता मार्ग सोयीस्कर असेल शिवाय नैसर्गिक सौंदर्याचा आनंदही घेता यावा, याबाबत माहित नसते. आज आम्ही आपणास असे काही हिल्स स्टेशनबाबत माहिती देत आहोत, ज्याठिकाणचा आनंद आपल्याला रेल्वरुटने अधिक घेता येईल. * शिमला शिमलामध्ये तर नैसर्गिक सौंदर्याचा खजिनाच आहे. या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांना येथे ट्रेनमध्ये फिरण्यास विशेष आवडते. रेल्वेमध्ये बसून हिमालयाच्या छोट्या-छोट्या पर्वत रांगामधून धावत असल्याचा आनंद काही औरच असतो. येथे धावणारी रेल्वे मंडी ते कुल्लू धावते. येथे बनवण्यात आलेला रेल्वे ट्रॅक अतिशय बारीक असून यास कालका ते शिमला दरम्यान बनवण्यात आले आहे. या ९६ किमीच्या प्रवासात तुम्हाला ८०६ ब्रिज, १०३ बोगदे आहेत. या रेलवे ट्रॅकला यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये सामिल करण्यात आले आहे.* घन दार्जिलिंग हिमालयात वसलेले हे अतिशय रमणीय हिल्स स्टेशन आहे. याठिकाणी एक छोटी ट्रेन आहे जी जलपाईगुडी आणि दार्जिलिंग दरम्यान चालवली जाते. विशेष म्हणजे या ट्रेनला वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये सहभागी करण्यात आले आहे. तसेच या घन स्टेशनला क्षेत्रफळाच्या हिशोबाने भरतातील मोठ्या स्टेशनमध्ये सामिल करण्यात आले आहे. हे स्टेशन २ हजार २५७ मीटर लांब आणि ७८ किमी इतक्या मोठ्या परिसरात पसरलेला आहे.* कोकण रेल्वे रत्नागिरी ते मडगांव-हुन्नारवर-मँगलोर मार्गे या कोकण रेल्वेतून प्रवास करताना तुम्हाला मनमोहक करणारे आकर्षक दृष्य पाहण्यास मिळतील. या प्रवासादरम्यान तुम्हाला सहयाद्री पर्वत रांगा, वळणा-वळणाचे रेल्वे ट्रॅक, ब्रिज, तलाव आणि पर्वतांवरून पडणारे पाणी पाहण्यास मिळेल.* ऊटी- नीलगिरी माउंटेन रेल्वेभारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक सुंदर हिल्स स्टेशन म्हणजे ऊटी. याठिकाणच्या खºया निसर्गाचा आनंद आपण रेल्वेमध्ये बसूनच चांगल्याप्रकारे घेऊ शकता. याच रेल्वेच्या छतावर प्रसिद्ध गाणे ‘चल छय्या-छय्या’ चित्रित करण्यात आले होते.* आहजू स्टेशनपठानकोठ आणि जोगिंदरनगर दरम्यान कांगरा व्हॅली पर्वतांवर तयार करण्यात आलेले स्टेशन आहे. सुमारे ३ हजार ९७० फुट परिसर यामध्ये कव्हर केला जातो. या रेल्वेसाठी बनवण्यात आलेला ट्रॅक हिमालय आणि हिमालयाशी निगडित पर्वतांमध्ये बनवण्यात आले असून येथील परिसर अतिशय सुंदर आहे.  * जोगिंदरनगर कांगरा व्हॅलीहून निघणारी ही रेल्वे पठानकोठ मार्गे जोगिंदरनगरला पोहचते. कांगरा व्हॅलीमधील सर्वात शेवटचे स्टेशन जोगिंदरनगर असून या दोन स्टेशन मधील अंतर ६४  किमी इतके आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी या रेल्वेमार्गाचा वापर केल्यास अधिक आनंद मिळतो.* अरोमा ते आसाम (गुवाहटी-लुमडिंग-सिल्चर) आसाममध्ये फिरायला जायायचे असेल तर एकदा येथील ट्रेनमध्ये अवश्य प्रवास करा. येथील ट्रेनच्या प्रवासादरम्यान तुम्हाला हिरवळ, नदी,चहाचे मळे पाहण्यास मिळतील. असाममधील या रेल्वे मार्गाला भारतातील सर्वात धोकादायक रेल्वे मार्ग मानले जाते.* ब्लू सी राइड (मंडपम्-पंबन-रामेश्वरम)या रेल्वेमधून प्रवास केल्यानंतर तुम्हाला असे बिलकूल जाणवणार नाही की, तुम्ही भारतामध्ये आहात. जगातील सर्वात मोठ्या समुद्रावरील ब्रिजवरून ही ट्रेन जाते. ही ट्रेन रामेश्वरमला पंबन आइसलँडला एकमेकांशी जोडते. ही ट्रेन पंबन ब्रिजहून निघते.* कश्मीर रेल्वे ट्रॅक या रेल्वे ट्रॅकला भारतातील अतिशय सुंदर मानले गेले आहे. कारण या रेल्वे प्रवासा दरम्यान आपणास २० बोगदे आणि १०० ब्रिजवरून प्रवास करता येणे शक्य आहे. हे सर्व बोगदे आणि ब्रिज हिमालयाच्या पर्वतांवर बनवण्यात आले आहेत. कश्मीरमध्ये रेल्वे ट्रॅक तयार करणे हे भारतीय रेल्वेसाठी अतिशय अवघड काम होते.* चंबल (आग्रा ते ग्वालियर) चबंल घाटीचे नाव तुम्ही ऐकले असेल. हे ठिकाण दरोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. असे बिलकूल नाही की येथून रेल्वे प्रवास करताना केवळ दरोडेखोरांचा सामाना करावा लागतो. तर येथील रेल्वे प्रवासामध्ये तुम्हाला इतर ठिकाणांसारखे पर्वत बघण्यास मिळणार नाही पण सगळीकडे हिरवळ पाहण्यास नक्की मिळेल.