संसर्गासारखा पसरतो असभ्यपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:11 AM
सर्दी, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार आपल्याला माहीत आहेत.
सर्दी, ताप आणि इतर संसर्गजन्य आजार आपल्याला माहीत आहेत. हिवाळ्यात तर 'व्हायरल' तापाचे रुग्ण वाढत असतात. पण तुम्हाला सांगितले की आपल्यात असणारा असभ्यपणा किंवा उद्धपटपणा हासुद्धा व्हायरला आजारांसारखा एकपासून दुसर्याक डे पसरतो असतो तर विश्वास बसणार नाही. पण एका रिसर्चनुसार सतत असभ्य वर्तनाच्या गर्तेत वावरल्याने आपले वर्तनदेखील तसेच होते.फ्लोरिडा विद्यापीठाचे ट्रेव्हर फोल्कख अँड्य्रू वूलम आणि आमिर इरेझ यांनी याविषयी संशोधन केले आहे. ते म्हणतात, 'आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वर्तनाचा आपल्या वागणुकीवर परिणाम होत असतो. त्यातल्या त्यात वाईट गोष्टींचा तर फारच लवकर. आपल्यासमोर जर नेहमी असभ्य वर्तणुक होत असेल तर आपला मेंदू आपोआप अशा विचारांना सक्रिय करतो.त्यांच्या मते याची दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे, समोरच्याची वागणूक खूपच हिंसक असेल तर परिणाम लवकर होतो आणि दुसरे म्हणजे असभ्य वर्तन करणारा आपल्यापेक्षा वयाने, दर्जाने मोठा असेल तर त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, हॉस्टेलमध्ये ज्या मुलांची रॅगिंग झाली ते मुलं त्यांच्या ज्युनिअरची रॅगिंग घेतात.