नववधूंनी असे सजवा घर !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 6:31 PM
लग्न करुन नववधू आपल्या सासरी जात असते. तेथील वातावरण तिच्यासाठी अगदी नवीनच असते. तिच्या मनात असंख्य विचार सुरु असतात. त्यातच तिच्यावर जबाबदारी असते ती म्हणजे गृहसजावटीची.
लग्न करुन नववधू आपल्या सासरी जात असते. तेथील वातावरण तिच्यासाठी अगदी नवीनच असते. तिच्या मनात असंख्य विचार सुरु असतात. त्यातच तिच्यावर जबाबदारी असते ती म्हणजे गृहसजावटीची. विशेष म्हणजे लग्नानंतर पती-पत्नीने जर एकत्र गृहसजावट केली तर त्याचा अनुभव काही वेगळाच असतो. कारण यातून फक्त प्रेमच वाढत नाही तर एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजूनही घेता येते. यामुळे तुमच्यासाठी गृहसजावटीच्या या काही खास टिप्स... किचननववधूचा लागलीच किचनशी संबंध येत असल्याने किचन तिला अगदी मॉड्यूलर हवे असते. त्यासाठी क्रॉकरीचे सामान ठेवण्यासाठी भिंतीला अडकवलेल्या कपाटाचा वापर करता येऊ शकतो. पॅन्स आणि भांडी अडकविण्यासाठी कॉर्कबोर्डचाही उपयोग करु शकता. तसेच सर्व काही इनबुल्ट ठेवा म्हणजे तुमचे किचन वेल आॅर्गनाइज्ड दिसेल. लिव्हींग रुमलिव्हींग रुम नेहमी प्रसन्न दिसावा असे नववधूला वाटते. त्यासाठी मॉडर्न स्ट्रेटलाईन फर्निचरची निवड करु शकता. विशेष म्हणजे हे फर्निचर विविध मॉडर्नमध्ये आपल्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत. लिव्हींग रुमचा क्लासिक लुक देण्यासाठी पांढरा, वाईन रेड किंवा ब्राऊन रंगांच्या शेड्सचीही निवड करु शकता. डायनिंग रुमडायनिंग रुमची सजावट करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे डायनिंग टेबल होय. याचबरोबर एका सुंदर लुकसाठी तुम्ही खोलीत रंगीत ग्लास लॅम्प्स आणि कंदील अडकवा. सौंदर्यात आणखी भर टाकण्यासाठी डायनिंग टेबलवर रंगीत मेणबत्त्या ठेऊ शकता.बेडरुमबेडरुममध्ये तुमचा बेड योग्य दिशेला असू द्या तसेच बेड खिडकीच्या जवळ नसल्याची खात्री करून घ्या. अस्थेटिक लुकसाठी, बाम्बू चिक्स आणि लाकडी पडद्यांचा समावेश करा. रिकाम्या भिंतीवर तुमच्या लग्नाचे आणि हनीमुनचे फोटो लाऊ शकता. यामुळे तुमच्या नातेही तेवढेच घट्ट होण्यास मदत होईल.