नाईट आऊट विथ शार्क
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2016 12:16 AM
तीन भाग्यवान विजेत्यांना या मत्सालयात (अॅक्वेरिअम) असणाऱ्या 35 शार्कस्च्या मधोमध राहण्याची आणि झोपण्याची संधी मिळणार आहे.
शार्क म्हटले की स्टीव्हन स्पीलबर्गचा ‘जॉज्’ चित्रपट आठवतो. समुद्रातील सर्वात भयंकर शिकारी म्हणून शार्क बदनाम आहे. मग अशा डेडली शार्क आजुबाजूला फिरत असताना तुम्हाला झोपायला सांगितले तर? आहे हिंमत? हो? तर मग तुमच्यासाठी ही बातमी आहे.‘एअर बीनबी’ नावाच्या कंपनीने अॅडव्हेंचर ट्रीप करू पाहणाऱ्या लोकांसाठी एका खास स्पर्धा सुरू केली आहे. पॅरिसच्या ‘अॅक्वेरिअम दी पॅरिस’सोबत मिळून ‘एअर बीनबी’ स्पर्धेतून निवडलेल्या तीन भाग्यवान विजेत्यांना या मत्सालयात (अॅक्वेरिअम) असणाऱ्या 35 शार्कस्च्या मधोमध राहण्याची आणि झोपण्याची संधी मिळणार आहे.त्यासाठी शॉर्क टँकमध्ये 30 फुट अंडरवॉटर एका खास काचेचे बेडरुम तयार करण्यात आले आहे. चोही बाजूने पारदर्शक या बेडरुममधून तुम्ही शार्कचे आयुष्य अगदी जवळून पाहू शकता. तसेच समुद्र जीवशास्त्रज्ञ आणि शार्क तज्ञ फ्रेड ब्युएलेकडून या शिकारी माशाबद्दल सखोल माहितीेदेखील मिळणार आहे.लोकांमध्ये असणाऱ्या शार्कबद्दल अनेक गैरसमजुतींना दुर करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे ‘एअर बीएनबी’ सांगितले. ही कंपनी अशा प्रकारे एकदम हटके आणि भिन्न अॅडव्हेंचर हॉलिडे प्लॅन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सदूर पर्वतांवर मंगोलियातील यर्ट (झोपडी, डच विंडमिल, पॅरिसमधील धार्मिक भुयारी मार्गांची सफर किंवा जंगलातील ट्री-हाऊस असे अनेक साहसी पर्याय कंपनी उपलब्ध करून देते. परंतु ही ‘शार्क नाईट आऊट’ आतापर्यंतची सर्वात अनोखी आॅफर आहे असेच म्हणावे लागेल.