शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

​चांगल्या लोकांचे नऊ गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2016 4:57 PM

जेन्युएन लोक असतात कसे, त्यांचे प्रमुख गुण कोणेत याविषयी प्रस्तुत लेखात जाणून घेणार आहोत.

‘भलाईचा जमानाच राहिलेला नाही’ असे आपण हमखास बोलतो किंवा ऐकतो. पण जर नीट विचार केला तर प्रश्न पडतो की, खरंच जगात चांगुलपणा संपला का? खऱ्यापणाला काही किंमत राहिली नाही का? याचे उत्तर नकारार्थी आहे. स्वच्छ मनाच्या चांगल्या लोकांना या जगात खूप किंमत आहे. ते कसं?आपल्या ५८ टक्के कार्यक्षमेतेसाठी आपला भावनांक (इमोशनल क्वोशंट) कारणीभूत असतो. एवढेच नाही तर अधिक इमोशलन क्वोशंट (ईक्यू) असणारे लोक कमी भावनांक असणाऱ्या लोकांपेक्षा वार्षिक १९.६ लाख रु. जास्त कमवतात असे एका रिसर्चमध्ये दिसून आले आहे. तुमचा भावनांक एका पॉर्इंटने जरी वाढला तरी त्यामुळे वार्षिक उत्पन्नात सुमारे ८७ हजार रुपयांची वाढ होते.परंतु भावनांक जास्त असण्याबरोबरच तुमच्या भावना खऱ्या असणे फार गरजेचे आहे. कारण लोक तुमच्या आचरणावरून तुमचे मुल्यांकन करत असतात. त्यामुळे भावनांक जास्त असण्यासह चांगुलपणा असणे आवश्यक आहे. इंग्लिशमध्ये ज्याला ‘जेन्युएन’ म्हणतात, तसे जेन्युएन तुम्ही असाल तर करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. पण मग हे जेन्युएन लोक असतात कसे, त्यांचे प्रमुख गुण कोणेत याविषयी प्रस्तुत लेखात जाणून घेणार आहोत.जेन्युएन लोक -१. स्वत:कडे मुद्दामहून लक्ष आकर्षित करीत नाहीतआपण जसे आहोत त्यामध्ये समाधान मानणारे लोक जेन्युएन असतात. ते स्वत:कडे लक्ष आकर्षित नसतात. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, आपली प्रशंसा करावी अशी इच्छा न बाळगता ते प्रामाणिकपणे काम करत असतात.२. पूर्वग्रह बनवत नाहीतस्वच्छ मनाचे लोक हे खूप मोकळ्या विचारांचे असतात. कोणात्याच बाबतीत ते पूर्वग्रह बनवत नाहीत. त्यामुळे नवविचारांना, कल्पनांना ते खुल्या दृष्टीकोनातून पाहू शकतात. म्हणूनच त्यांच्याशी बोलायला सर्वच जण उत्सुक असतात.३. स्वत:ची वाट निवडतातइतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याला ते फारसे महत्त्व देत नाहीत. आतल्या आवाजाला साद घालत ते स्वत:ची वाट आणि दिशा निवडतात. आपण कोण आहोत आणि आपल्याला काय व्हायचे नाही याची पूर्ण जाणीव त्यांना असते.४. हातचे राखून ठेवत नाहीबरेच लोक त्यांच्यापाशी असलेली माहिती किंवा मार्गदर्शन इतरांना सांगत नाही. दुसरे लोक आपल्या पुढे जातील अशी त्यांना भीती असते. अस्सल लोकांना स्वत:वर विश्वास असतो आणि इतरांना मदत करण्याची त्यांची मूळ प्रवृत्ती असते.५. सर्वांना आदराने वागवतातवेटरपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांनाचा आदराने वागणूक देण्याची त्यांची वृत्ती असते. सर्वांशी आदर आणि विनम्रतेने ते वागत असतात. इतर लोक आपल्याशी कसेही वागू देत, चांगले लोक स्वत:चा चांगुलपणा कधी सोडत नाहीत.६. प्रलोभनांना भुलत नाहीतक्षणिक प्रगतीसाठी ते कधीच आपल्या तत्त्वाशी प्रतारणा करीत नाहीत. प्रलोभनांपासून चार हात दूर राहण्याचा ते कटाक्ष पाळतात. भौतिक गोष्टी किंवा चैनीच्या वस्तूंमधून स्वत:चे व्यक्तीमत्त्व निखारण्याचा ते कधीच प्रयत्न करीत नाहीत.७. टीकेचा सन्मान करतातसमोरचा व्यक्ती जर आपल्या विचारांशी भिन्न मत मांडत असेल तर ते त्याचा सन्मान करतात. स्वत:वर होणाºया टीकेचे ते स्वागतच करतात. टीकाकारांचे चरित्रहनन किंवा मुस्कट दाबी करण्याचे ते कधीच प्रयत्न करीत नाहीत. शांतपणे त्यांचे म्हणने ऐकून घेतात.८. मुळात ढोंगी नसतातबोलायचे एक आणि करायचे एक असा जेन्युएन लोकांचा स्वभावच नसतो. ‘जैसे बोले, तैसे चाले’ या तत्त्वाप्रमाणे ते आयुष्य जगत असतात. स्वत:चेच म्हणने रेटण्याचा, स्वत:चेच खरे करण्याचा ते कधी प्रयत्न करीत नाही. एकंदर काय तर ते ढोंगी नसतात.९. फुशारक्या मारत नाहीत‘मी असा अन् मी तसा’ अशा बढाया मारून ते स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध करीत नसतात. जेव्हा स्वत:मध्ये कमी असते तेव्हाच व्यक्ती फुशारक्या मारत असतो. आत्मविश्वसाने परिपूर्ण व्यक्तीला पोकळ प्रशंसा, प्रतिष्ठेची गरज नसते. ते स्वत:चे कर्तत्त्व आणि श्रेष्ठत्व कृतीतून दाखवून देतात.