तब्बल सहा वर्षांच्या रिलेनशनशिपनंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा मोस्ट अवेटेड विवाहसोहळा इटलीमध्ये धुमधड्याक्यात पार पडला. इटलीतील लेक कोमो या ठिकाणी बॉलिवूडचं फेमस कपल दीपिका रणवीरने आपली लग्नगाठ बांधली. अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे फक्त दोनच फोटो शेअर करण्यात आले आहेत. तरिदेखील हे फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो शेअर होताच चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या दीपिकाच्या ब्राइडल लूककडे. जाणून घेऊयात काही गोष्टी दीपिकाच्या या नववधू लूकबाबत....
दीपिकाचा चूडा आणि कलीरे
दीपिकाच्या सिंधी पद्धतीने केलेल्या विवाह सोहळ्यामधील लूकबाबत बोलायचे झाले तर तिने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. परंतु तिच्या लेहेंग्यापेक्षा तिच्या चुनरीची सर्वात जास्त चर्चा होत आहे. कारण तिच्या चुनरीवर 'सदा सौभाग्यवती भवः' असं लिहिलं होतं. अशातच दीपिकाचा चूडा आणि कलीरेही आपलं लक्ष वेधून घेतात. पंजाबी आणि सिंधी लग्नांमध्ये चूडा आणि कलीरे परिधान करण्याची परंपरा आहे. दीपिका पादुकोणने ट्रेडिशनल लाल आणि सोनेरी रंगाचा सिंम्पल चूडा परिधान केला असून त्याचसोबत गोल्डन रंगाचे कलीरेदेखील परिधान केले होते. दीपिकाने परिधान केलेल्या कलिऱ्यांवर सुंदर डिझाइनदेखील करण्यात आलं होतं.
कस्टमाइज्ड होते सोनम कपूरचे कलीरे
बॉलिवूडची फॅशन क्विन सोनम कपूरने याच वर्षी मे महिन्यामध्ये आपवी लग्नगाठ बिजनेसमन आनंद आहुजासोबत बांधली होती. पंजाबी स्टाइलमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्यामध्ये सोनम नववधूच्या वेशात फार सुंदर दिसत होती. सोनमचा चूडा काही प्रमाणात दीपिकाप्रमाणेच होता. परंतु कलीरे दीपिकापेक्षा जास्त वर्क असलेली आणि खास तयार करून घेण्यात आलेली होती. सोनमचे कलीरे गोल्डन रंगाचे होते परंतु त्यामध्ये मोर असलेलं नक्षीकाम करण्यात आलं होतं.