आता साजरा होणार ‘हेटरोसेक्शुअल प्राईड डे’?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2016 3:20 PM
९ जून हा ‘हेटरोसेक्शुअल प्राईड डे’ म्हणून घोषित केला जावा यासाठी ट्विटरवर ‘#हेटरोसेक्शुअलप्राईडडे’ हा हॅशटॅग ट्रेडिंग होतोय.
संपूर्ण जगात बऱ्याच ठिकाणी समलिंगी कम्युनिटिज् ‘गे प्राईड’ डे सेलिबे्रेट करतात. समलैंगिकांचे अधिकार, समाजात जागृती करणे असा त्याचा उद्देश असतो.पण आता एक वेगळीच मागणी जोर धरू लागली आहे. २९ जून हा ‘हेटरोसेक्शुअल प्राईड डे’ म्हणून घोषित केला जावा यासाठी ट्विटरवर ‘#हेटरोसेक्शुअलप्राईडडे’ हा हॅशटॅग ट्रेडिंग होतोय.लोक हा हॅशटॅग वापरून एकमेकांना शुभेच्छा देत होते. ज्या प्रकारे समलैंगिकांना स्वाभामिन असतो, त्याप्रमाणे भिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होणाºया व्यक्तीलादेखील असतो. म्हणून आम्ही का नाही असा दिवस साजरा करायचा, अशा आशयाचे ट्विट्स केले जात होते.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जून महिना ‘एलजीबीटी प्राईड मंथ’ म्हणून घोषित केला आहे. }}}}अनेकांनी यावर टीकासुद्धा केली. इंग्लंडचा कॉमेडियन डॅपर लाफ्सने ट्विट केले की, आता मग पुढे ‘#ब्रिदिंगएअरडे’ (श्वासनवायू दिवस) देखील सुरू करणार का? ज्या व्यक्तीने सर्व प्रथम हे ट्विट केले त्याने मात्र याविषयावर पुढे बोलण्यास नकार दिला. आता असे ट्विट करण्यामागे त्याचा खरंच प्रामाणिक हेतू होता की त्याला केवळ सोशल मीडियावर खळबळ उडवून द्यायची होती, हे अद्याप तरी स्पष्ट नाही. }}}}