आता फेसबुक सांगणार आसपासचे ‘वाय-फाय’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2016 3:41 PM
फेसबुक स्वत:हून तुम्हाला जवळपासचे वाय-फाय कुठे आहे याची माहिती देणार.
फेसबुकने आपल्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये शिरकाव केलेला आहे. आपल्या ओळखीच्या लोकांशी कनेक्टेड राहण्याच्या उद्देशाने सुरू झालेले ‘फेसबुक’ आता पूर्णपणे बदललेले आहे. बातम्यांपासून ते जाहिरातीपर्यंत सर्वच गोष्टी फेसबुकच्या माध्यमातून करता येतात.अशा मल्टीपर्पज सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर आणखी एका फीचरची भर पडली आहे.तुमचे मोबाईल इंटरनेट जर स्लो असेल तर फेसबुक स्वत:हून तुम्हाला जवळपासचे वाय-फाय कुठे आहे याची माहिती देणार. ‘रिअल-टाईम इन्फॉर्मेशन शेअरिंग’च्या सुविधेसाठी कंपनीने हे नवे फीचर विकसित केले आहे.यापूर्वी ‘पेजेस्’द्वारे विविध वाय-फाय स्पॉटचे मूळ लोकेशनची माहिती कंपनी गोळा करत असे. याच माहितीच्या आधारे फेसबुकने ‘वाय-फाय’ शोधण्याचे फीचर तयार केले आहे. इंटरनेट कनेक्शन जर बेताचे असेल तर फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करणे असुविधेचे ठरते. अशा वेळी जर यूजरला स्ट्राँग नेट कनेक्शन देणारे आसपासचे वाय-फाय स्पॉट शोधून देऊ शकलो तर कंपनीचा ‘रिअल-टाईम इन्फॉर्मेशन शेअरिंग’चा व्यवसाय वाढेल हा विचार या फीचर मागे आहे. त्यामुळे मग लाईव्ह बातम्या, व्हायरल होऊ शकणारे व्हिडिओ फेसबुकला मिळतील. काही निवडक आयओएस यूजर्सना ही सुविधा देण्यात आली असून लवकर अँड्रॉईड यूजर्सना ती पुरवण्यात येण्याची शक्यता आहे. चला तर म्हणजे जास्तीत जास्त काळ यूजर्सना फेसबुकवर गुंतविण्यासाठी कंपनीने ही नामी शक्कल लढवली आहे.वाचा : फेसबुुकवर अनोळखी व्यक्ती त्रास देतोय ?वाचा : फेसबुकचे संदेश व्हॉटस अॅपला असे करा शेअर