आता इन्स्टाग्रामवरही लाईव्ह व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2016 4:21 PM
सोशल मीडियात इन्स्टाग्रामचे नाव आवर्जून घेतले जाते. इन्स्टाग्रामदेखील आपल्या युजर्सना अपडेट ठेवण्यात मागे नाही. आपल्या युजर्ससाठी इन्स्टाग्रामने आता लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंगसह अदृश्य होणाºया संदेशाचे फिचर प्रदान केले आहे.
सोशल मीडियात इन्स्टाग्रामचे नाव आवर्जून घेतले जाते. इन्स्टाग्रामदेखील आपल्या युजर्सना अपडेट ठेवण्यात मागे नाही. आपल्या युजर्ससाठी इन्स्टाग्रामने आता लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंगसह अदृश्य होणाºया संदेशाचे फिचर प्रदान केले आहे. यासाठी मात्र, युजर्सना इन्स्टाग्राम अपडेट करावे लागणार आहे. या अपडेटमध्ये आता इन्स्टाग्रामचे युजर इतर युजर्सला मॅसेजच्या स्वरूपात अदृश्य होणाºया प्रतिमा वा व्हिडीओ टाकू शकतील. या फिचरचे वैशिट्य म्हणजे यात लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा त्यात दिली आहे. यामुळे कुणीही युजर आता आपल्या स्मार्टफोनमधील कॅमेºयाच्या मदतीने आपल्या भोवतालच्या कोणत्याही घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकू शकेल. यासाठी खास बटन देण्यात आले आहे. हा व्हिडीओ त्याला फॉलो करणारे युजर्स पाहू शकतील. म्हणजेच इन्स्टाग्रामच्या ‘स्टोरीज’वर हा व्हिडीओ दिसणार आहे. ‘इन्स्टाग्राम डायरेक्ट’साठी ही सुविधा असून समोरील युजरने ही प्रतिमा अथवा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो आपोआप नष्ट होईल. या माध्यमातून फेसबुक ट्विटरच्या पेरिस्कोपला टक्कर देणार असल्याचे मानले जात आहे. फेसबुकने हे फिचर स्नॅपचॅटवरून उचलले असल्याचे स्पष्ट आहे.