आता ‘व्हॉट्स अॅप’ अजूनही सुरक्षित...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2016 5:50 PM
यूजर्ससाठी व्हॉट्स अॅपने नुकतीच नव्या पद्धतीची टू-स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केली आहे. हा नवा विकल्प व्हॉट्स अॅपच्या विंडोज बीटा व एंड्रॉयड अॅप यूजर्ससाठी असून यामुळे व्हॉट्स अॅप अकाऊंट अजूनही सुरक्षित होत आहे.
यूजर्ससाठी व्हॉट्स अॅपने नुकतीच नव्या पद्धतीची टू-स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केली आहे. हा नवा विकल्प व्हॉट्स अॅपच्या विंडोज बीटा व एंड्रॉयड अॅप यूजर्ससाठी असून यामुळे व्हॉट्स अॅप अकाऊंट अजूनही सुरक्षित होत आहे. आता फक्त बीटा यूजर्ससाठी टू-स्टेप व्हेरीफिकेशन फीचर उपलब्ध असून, आगामी काळात सर्व यूजर्ससाठी हे फीचर जाहीर करण्यात येणार आहे.या व्हर्जनवर उपलब्धएंड्रायडवर २.१६.३४१ किंवा यानंतर येणारे बिटा अॅप व्हर्जनचा वापर करणारे यूजर्स टू-स्टेप व्हेरीफिकेशन इनेबल करु शकतात. तसेच व्हॉट्स अॅपच्या २.१६.२८० व्हर्जनचे वापर करणारे विंडोज १० मोबाइल बिटा यूजर्सदेखील या सुरक्षित फिचरला इनेबल करु शकतात. अशी करा सेटिंगएंड्रॉयड व विंडोज बीटा यूजर्स सेटिंग >अकाउंट >सिक्युरिटी मधील टू स्टेप व्हेरिफिकेशनला इनेबल करु शकता.व्हॉट्स अॅपनुसार टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर विकल्पीय असून, यात अगोदरच टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल आहे. मात्र, व्हॉट्स अॅपवर फोन नंबरच्या व्हेरिफिकेशनसाठी सहा आकड्यांचा पिनकोडदेखील गरजेचा असतो. त्यानंतर गरजेनुसार ईमेल अड्रेस टू-स्टेप व्हेरिफिकेशनला डिसेबल करण्यासाठी विचारला जातो. जर आपण सहा आकडी पासकोड विसरलात तर कंपनी सात दिवसापर्यंत पुन्हा व्हेरीफिकेशन करु देत नाही. कंपनीने सांगितले आहे की, या सात दिवसानंतर आपल्या नंबरला पिनकोड विना पुन्हा व्हेरीफिकेशन केले जाईल आपले सर्व मेसेज डिलीट होतील. जर आपल्या नंबरचा पूर्वी वापर केल्यानंतर विना पिनकोडचे व्हॉट्स अॅप ३० दिवसानंतर पुन्हा व्हेरीफिकेशन केले जाते, तर आपले अकाऊंट डिलीट होते आणि पुन्हा यशस्वी व्हेरीफिकेशन केल्यानंतर एक नवे अकाऊंट बनते.