यंदाच्या पावसाळ््यात करा आॅफबीट भटकंती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2016 9:40 AM
पावसाळा सुरु झाला की सगळ््यांनाच पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पाऊस ऐंजॉय करण्याचे वेध लागतात. पावसाळ््यात पर्यटकांना अनेक धबधबे साद घालीत असतात. वरुन पडणाºया पावसात, धबधब्यात ओले चिंब भिजण्याचा आनंद हा काही औरच असतो. पण पावसाळ््यातील ट्रीप म्हटले की डोळ््यासमोर काही टिपिकल ठिकाणेच येतात. पण आपल्याकडे काही अशा प्लेसेस आहेत ज्या पर्यटकांना माहित जरी नसल्या तरी अप्रतिम सौंदर्यांनी बहरलेल्या
प्रियांका लोंढे पावसाळा सुरु झाला की सगळ््यांनाच पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पाऊस ऐंजॉय करण्याचे वेध लागतात. पावसाळ््यात पर्यटकांना अनेक धबधबे साद घालीत असतात. वरुन पडणाºया पावसात, धबधब्यात ओले चिंब भिजण्याचा आनंद हा काही औरच असतो. पण पावसाळ््यातील ट्रीप म्हटले की डोळ््यासमोर काही टिपिकल ठिकाणेच येतात. पण आपल्याकडे काही अशा प्लेसेस आहेत ज्या पर्यटकांना माहित जरी नसल्या तरी अप्रतिम सौंदर्यांनी बहरलेल्या आहेत मग अशा आॅफबिट ठिकाणांची भटकंती जर या पावसाळ््यात केली तर काय हरकत आहे. अशाच काही ठिकाणांची ही माहिती खास हौशी पर्यटकांसाठी..... तापोळा : महाराष्ट्रातील मिनि काश्मीर म्हणुन तापोळ््याकडे पाहिले जाते. तापोळ््याचे निसर्ग सौंदर्य डोळ दिपवून टाकण्यासारखे आहे. महाबळेश्वर पासुन २५ किलोमीटर अंतरावर असणारे हे ठिकाण पावसाळ््यात अधिकच नयनरम्य भासते. पर्यटकांना तापोळ््याला जायचे असेल तर जवळच महाबळेश्वर सफर देखील होऊ शकते. तापोळ््याचे खरे अॅट्रॅक्शन म्हणजे तिथला शिवसागर लेक. भरपुर पाणी असलेल्या या निळ््याशार तळ््यामध्ये म्सतपैकी बोटिंगचा आनंद तुम्ही घेऊ शकता. सोलानपाडा धबधबा : मुंबई पासुन जवळच असलेल्या कर्जतमध्ये सोलानपाडा धबधबा पर्यटकांना खुणावीत असतो. कर्जतच्या निसर्गसौंदर्यात मोरपंख रोवावा असा हा वॉटरफॉल आहे. कर्जत रेल्वे स्टेशनपासुन २६ किलोमीटरवर हा सुंदर धबधबा तुम्हाला पहायला मिळेल. या धबधब्याचे वैशिष्ठ्य म्हणजे हा निसर्गर्निर्मित वॉटरफॉल नसुन तो पर्यटकांना मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता यावा यासाठी तयार करण्यात आलेला मानवनिर्मित धबधबा आहे. सोलनपाडा डॅमवर बांधण्यात आलेला हा धबधबा पर्यटकांना आकर्षित तर करतोच परंतू ही जागा पाहण्यासाठी देखील अतिशय मनमोहक आहे. स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच पण बाकी पर्यटकांसाठी दर पंधरा मिनिटांनी मिनी बसची व्यवस्था कर्जतपासुन करण्यात आली आहे. पावसाळा हा या धबधब्याला भेट देण्याचा बेस्ट सिझन आहे.मार्लेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये मार्लेश्वर मंदिर आहे. हे मंदिर अतिशय सुंदर असुन डांगरावर वसलेले आहे. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर याठीकाणी गर्दी करतात. पावसाळ््यात येथील नजराणा पाहण्यासारखा असतो. कोकणातील पाऊस तर सर्वांनाच माहित आहे अन त्यामुळेच हे मंदिर पावसातही भाविकांना येण्यापासुन रोखत नाही. एवढेच नाही तर बाव नदीवरील धारेश्वर हा धबधबा देखील येथील प्रमुख आकर्षण आहे. संगमेश्वरपासुन ३० किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर आहे. देवरुख वरुन थेट वसेस देखील मार्लेश्वरला जातात. भिवपुरी : माथेरानच्या कुशीत असलेलं हे ठिकाण मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळ पर्यटकांसाठी हॉटेल्स देखील आहेत. येथे गावकºयांना सांगितल्यास ते जेवणाची उत्तम सोय देखील करतात. भिवपुरीला धबधब्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी येथे भरपूर पर्यटक गर्दी करतात. चिंचोटी : येथे पोहोचण्यासाठी हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या मार्गावर ठिकठिकाणी धबधबे पाहायला मिळतात. मुख्य धबधब्याजवळ पोहचायला सुमारे तासभर चालावं लागतं. दहिसर टोलनाक्यानंतर कामन जंक्शनजवळ हे ठिकाण आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जाता येतं. तुंगारेश्वर : नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद येथे घेता येतो. मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर तुंगारेश्वर आहे. पर्यटकांसाठी डोंगरावर मात्र कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही. त्यामुळे तुम्हाला स्वत:ची व्यवस्था करुनच जावं लागतं. पांडवकडा : खारघर परिसरात पांडवकडा या धबधब्यावर गेल्या दहा वर्षांपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पर्यटक गर्दी करत असतात. पण हा धबधबा रिस्की आहे. त्यामुळे धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे. पण अनेक पर्यटक पांडवकड्याला भेट देण्यासाठी येथे येतात. डोंगराने नेसलेला हिरवाकंच शालू पर्यटकांना भुरळ घालत असतो. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर स्टेशनवरून या ठिकाणी जाता येते. निसगार्चं सुंदर रुप येथे पाहायला मिळतं.कोंडेश्वर : बदलापूरपासून 6 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर हा धबधबा आहे. येथे दोन धबधबे आहेत. बदलापूर पूर्वेकडून भोज-दहिवली शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. कुंडात डोह असून त्यात कपाºया असल्याने येथे पाण्यात उतरताना पुरेशी खबरदारी घ्यावी लागते.