शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

​आॅफिस मॅनर्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 3:50 PM

बहुतेकजणांचा दिवसाचा बराच वेळ आॅफिसमध्येच व्यतीत होतो. त्यामुळे आॅफिसमध्ये वेगवेगळ्या लोकांशी असलेला आपला व्यवहार खूप महत्त्वपूर्ण असतो.

-Ravindra Moreबहुतेकजणांचा दिवसाचा बराच वेळ आॅफिसमध्येच व्यतीत होतो. त्यामुळे आॅफिसमध्ये वेगवेगळ्या लोकांशी असलेला आपला व्यवहार खूप महत्त्वपूर्ण असतो. त्यात आपले बोलणे, वागणे, हसणे, बसणे आदी गोष्टी आॅफिस मॅनर्समध्ये गणल्या जात असून, याचा परिणाम आपल्या व्यक्तित्वावर होत असतो. आजच्या सदरात आॅफिसमध्ये आपला व्यवहार कसा असावा याबाबत जाणून घेऊया...* क्षेत्रीय भाषेचा कमी वापर करावा- आॅफिसमधल्या टीमच्या सदस्यांसोबत चर्चा करताना विशेषत: सामूहिक बैठकीत आपल्या क्षेत्रीय भाषेचा वापर टाळावा. टीममध्ये असेही लोक असतील की त्यांना तुमची भाषा समजत नसेल. अशाने त्या लोकांना वेगळेपण तर वाटेलच शिवाय त्यांच्या मनातील आपल्याबद्दलच्या भावनादेखील बदलतील. * मिटींगला वेळेवर पोहचा-आॅफिसच्या मिटींगला वेळेवर न पोहोचल्याने आपण किती निष्काळजी आहोत असा समज इतर सदस्यांना होतो. यासाठी वेळेवरच मिटींगला पोहोचा. जर आपल्या मिटींग्ज एका पाठोपाठ एक असतील तर त्या दरम्यान पर्याप्त कालावधी असावा, जेणेकरून तुम्हाला मिटींगमध्ये हजर राहण्यासाठी वेळ मिळेल. * साफ-सफाईकडे दुर्लक्ष नको-आॅफिसमध्ये आपले डेस्क नेहमी स्वच्छ तर असावे, शिवाय आपल्या स्वत:च्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष द्यावे. जर आपले डेस्क अस्वच्छ असेल किंवा आपले साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असेल तर काम करायला आपले मन रमणार नाही आणि आपल्या सोबतच्या सहकाऱ्यानाही अडचणी निर्माण होतील.* वरिष्ठांना करा फॉलो-आॅफिसात जर आपल्या चांगल्या वागणुकीची छाप पाडायची असेल तर आपण वरिष्ठांना फॉलो करावे. उच्च पदावर काम करणारे आपले वरिष्ठ आपल्यासाठी एक आदर्श ठरु शकतात, ज्यांना फॉलो करुन आपणही भविष्यात यश मिळवू शकतो.* नेहमी चांगले वागण्याचा करा प्रयत्न-आॅफिसमध्ये आपले बोलणे, वागणे नेहमी चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी कम्युनिकेशन स्कील वाढविण्यावर भर द्या. यामुळे आपण व आपल्या सहकाऱ्यामध्ये होणारे गैरसमज आपोआपच संपुष्टात येतील. आॅफिसमध्ये या सवयी टाळाआॅफिसच्या कामात आपला परफॉर्मन्स कितीही चांगला असेल पण आपल्यात जर काही वाईट सवयी असतील तर त्या आपल्या सहकाºयांना तसेच बॉसला नक्कीच आवडणार नाहीत. अशावेळी आपली आॅफिसमध्ये चुकीची इमेज बनू नये, यासाठी काही सवयींची यादी खाली देण्यात आली आहे. त्या वाचा व टाळा.* आॅफिसला उशिरा पोहोचणेकधी-कधी आॅफिसला उशीर होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण जर ही  नेहमीची सवय बनली तर ते चुकीचे आहे. रोज आॅफिसला उशीर करणे आपली इमेज बिघडवू शकतो. * फोनवर जास्त वेळ बोलणे जर आपण आॅफिसमध्ये मोठ्या आवाजात खूप वेळ गप्पा मारत असू तर ते योग्य नाही. यामुळे तुम्ही तुमचे कामात लक्ष नाही असे ठरविण्यात येते. इतकेच नाही तर आॅफिसमध्ये असताना फोनची रिंगटोनही कमी आवाजात ठेवावी. * गॉसिपिंग करणेजर आपण आपल्या सहकाऱ्याशी गॉसिपिंग करत आहात तर तुमच्या इतर सहकाऱ्याना असेच वाटेल की तुम्ही त्यांच्याविषयीच बोलत आहात. यामुळे आॅफिसमध्ये तुमच्याबद्दल नकारात्मक भावना वाढीस लागू शकते. त्यामुळे अशा गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवा. * आपल्या कामाबद्दल वाईट बोलणेआपण या गोष्टी आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकतो पण आॅफिसमधील सहकाऱ्यासोबत या गोष्टी सांगणे योग्य नाही. या गोष्टी आपल्या बॉसपर्यंत पोहोचल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या कामावर होऊ शकतो. * आॅफिस डेस्कवर कचराघर आपण कसेही ठेवत असू पण आपल्या आॅफिस केबिनला नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. कागदांचा कचरा, खाण्याची पाकिटे डेस्कवर ठेऊन घाण करू नये.