शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

OMG : गूगल आपल्याबाबतची ‘ही’ सर्व माहिती साठवून ठेवतोय !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 7:07 AM

आपण youtube वर कोणता video कधी पहिला, शिवाय Google वर काय काय आणि कधी Search केले याची तंतोतंत माहिती Google साठवून ठेवतोय...

-Ravindra More आपण रोज गूगलच्या कित्येक वेब सेवांचा प्रयोग करतो, जसे गूगल सर्च, गूगल क्रोम ब्राउजर, गूगल मॅप, यूट्यूब, अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईल आॅपरेटिंग सिस्टम, हिंदी कीबोर्ड आदी. या सेवांचा प्रयोग करताना गूगल आपल्याबाबतची बरीच माहिती आणि सूचना जाणून घेतो आणि एकत्रित करुन ठेवतो ज्याद्वारे गूगल आपल्याला आपल्यासाठी अनुकूल सेवा आणि माहिती उपलब्ध करुन देतो. चला मग समजून घेऊया की, गूगल आपल्याबाबत काय काय जाणतोय?* आतापर्यंत गूगलमध्ये आपण जे काही सर्च केले आहे तेआपण आतापर्यंत गूगलमध्ये जे काही लिहून सर्च केले आहे, ते सर्व कीवर्ड आणि वाक्य गूगलमध्ये स्टोर असतात, त्यांना आपण खालील लिंकवर पाहू शकता, (हे फक्त आपणास दिसेल, दूसऱ्या कुणालाच नाही आणि हे पाहण्यासाठी आपणास गूगल अकाउंटमध्ये लॉगिन करावे लागेल)https://history.google.com/history/* गूगलच्या सेवांवरील आपल्या सर्व अ‍ॅक्टिव्हिटीआपण गूगलच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये गूगल अकाउंटने लॉगिन करु न जे काही केले आहे, याचे संपूर्ण रेकॉर्ड आपण खालील लिंकवर जाऊन पाहू शकता. https://myactivity.google.com/myactivity* आपणाद्वारे गूगलवर देण्यात आलेली व्यक्तिगत माहितीआपले गूगल अकाउंट बनविताना किंवा नंतर गूगलचा वापर करताना जी काही व्यक्तिगत माहिती जसे मोबाइल नंबर, जन्म दिनांक आदी गूगलवर दिली आहे, ती माहिती आपण खालील लिंकवर जाऊन पाहू शकता. https://myaccount.google.com/privacy?pli=1#personalinfo* कोणकोणत्या मोबाइल, टॅबलेट आणि संगणकाद्वारे गूगलवर लॉगिन केले आहेआपण आतापर्यंत ज्या ज्या मोबाइल, टॅबलेट किंवा संगणकाद्वारे गूगल अकाउंटचा प्रयोग केला आहे, याची संपूर्ण माहिती खालील लिंकद्वारे मिळविता येऊ शकते. https://security.google.com/settings/security/activityया लिंकवर गूगल आपण या डिवाईसवर शेवटचे लॉगिन केव्हा केले आहे, हे देखील दर्शवेल. * क्रोम किंवा अ‍ॅण्ड्राइडवर जो लॉगिन पासवर्ड सेव केला आहेआपण संगणक किंवा अ‍ॅण्ड्राइड मोबाइलवर कोणत्याही वेबसाइटवर लॉगिन करतेवेळी जे यूजरनेम आणि पासवर्ड क्रोम ब्राउजरमध्ये सेव केले आहे, याची माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर जाऊन पाहू शकता. https://passwords.google.com/* कोणकोणत्या वेबसाइटला गूगल खात्याच्या प्रयोगासाठी स्वीकृती देण्यात आलीआपण बऱ्याच वेबसाइटवर गूगलच्या माध्यमाने लॉगिन करतो, असे करतेवेळी आपण त्या वेबसाइट्सला आपल्या गूगल अकाउंटशी संबंधीत माहिती पूरवत असतो. याची संपूर्ण सूची खालील लिंकवर पाहण्यास मिळेल. https://myaccount.google.com/security#connectedapps* आपण कोणकोणत्या ठिकाणी गेले आहेत- लोकेशन हिस्ट्रीगूगल सेवांचा प्रयोग करतेवेळी आपण गूगलला आपले लोकेशन जाणून घेण्याची परवानगी देतो. आतापर्यंत आपण कोणकोणत्या ठिकाणी गेलो आहोत, त्या ठिकाणची आणि रस्त्यांची संपूर्ण माहिती आणि आपली लोकेशन हिस्ट्री आपण खालील गूगल लिंकच्या आधारे जाणू शकता.https://www.google.com/maps/timeline* गूगलच्या कोणकोणत्या सेवांचा प्रयोग केला आहे, त्यासंबंधीत माहितीगूगल डॅशबोर्डच्या खालील लिंकद्वारे आपण हे जाणू शकता की, आपण कोणकोणत्या गूगल सेवांचा प्रयोग करीत आहात. येथे आपण त्या सेवांशी जुडलेली सेटिंग बदलू शकता आणि माहिती मिळवू शकता.https://www.google.com/settings/dashboard* ओके गूगल आणि व्हॉइस कमांडद्वारे आपण काय काय बोलले आपण गूगलला ओके गूूगल किंवा गूगलवर बोलून जे काही इनपूत दिले आहे, याची संपूर्ण रेकॉर्डिंग आपण खालील लिंकद्वारे ऐकू शकता. https://history.google.com/history/audio* आतापर्यंत यूट्यूबवर काय काय लिहून सर्च केलेआपण गूूगलची व्हिडिओ सेवा यूट्यूबवर आपल्या पसंतीचे व्हिडिओ सर्च क रण्यासाठी जे काही लिहून सर्च केले आहे, त्याची संपूर्ण सूची खालील लिंकवर जाऊन पाहू शकता. https://history.google.com/history/youtube/search* यूट्यूबवर आतापर्यंत कोणकोणते व्हिडिओ पाहिलेतयूट्यूबवर गूगलने लॉगिन करुन आपण आतापर्यंत कोणकोणते व्हिडिओ पाहिले आहेत या सर्व व्हिडिओंची सूची पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://history.google.com/history/youtube/watch* आपण किती गूगल स्टोरेजचा प्रयोग करीत आहातजेव्हाही आपण जीमेल, गूगल फोटो आणि अन्य गूगल सेवांचा प्रयोग करता, तेव्हा आपणास इंटरनेटवर १५ जीबीपर्यंत मेमरी स्पेस मोफत मिळते. यापैकी किती मेमरी शिल्लक आहे, हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://myaccount.google.com/preferences#storage * आपणास कोणकोणत्या विषयात आवड आहेगूगल आपणास आवश्यक आणि योग्य जाहिराती दाखविण्यासाठी आपण केलेले सर्च आणि आपल्या अ‍ॅक्टिव्हिटीजच्या आधारे आपली आवड जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. खालील लिंकच्या आधारे जाणून घेऊया की, गूगलने आपल्या आवडीबाबत काय माहिती एकत्रित केली आहे.https://www.google.com/settings/ads/authenticated