OMG : तरुणाईत वाढतेय 'मोटरसायकल फॅशन'ची क्रेझ !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 1:08 PM
सध्या मोटरसायकल फॅशनची हवा आहे. मोटरसायकल फॅशन म्हणजे काय? जाणून घेऊ या...।
-रवींद्र मोरे जसजसी लोकांची लाइफस्टाइल बदलत आहे, त्याच पद्धतीने मोटारसायकलचा लूकदेखील बदलत आहे. बऱ्याच सेलिब्रिटींकडे आपल्या लाइफस्टाइलला सुट होईल त्यानुसार अत्यंत महागड्या आणि आकर्षक लूकच्या मोटरसायकल्स आहेत. शिवाय चित्रपटातही नायकाचा लूक फॅशनेबल दाखविण्यासाठी वेगवेगळ्या मोटरसायकल्सचा वापर केला जातो. त्यांचेच अनुकरण करुन सध्याची तरुणाईमध्ये मोटरसायकल फॅशनची के्रझ वाढत चालली आहे. आज आम्ही आपणास मोटरसायकल फॅशन अधिक स्टायलिश होण्यासाठी काही टिप्स देत आहोत. बायकिंग ही नव्या जमान्याची पॅशन आहे. बाईकवर लेह लडाखची ट्रिप करण्याइतकं दुसरं कोणतंही थ्रिल नाही. पण बायकिंग करायचं तर फॅशनही तशीच हवी. सध्या मोटरसायकल फॅशनची हवा आहे. मोटरसायकल फॅशन म्हणजे काय? जाणून घेऊ या...।* मोटरसायकल फॅशन कॅरी करताना हेल्मेटचा विचार व्हायलाच हवा. ट्रेंडी हेल्मेट हा मोटरसायकल फॅशनचा महत्त्वाचा हिस्सा आहे. * मोटरसायकल हे स्वातंत्र्याचं प्रतीक बनून गेलंय. बाईकवर सुसाट सुटण्याइतका दुसरा कोणताही आनंद नाही. रोमॅटिक जोडप्यांसाठी ही मोटरसायकलवर फिरण्यासारखी दुसरी मजा नाही. या प्रवासात प्रेम जरा जास्तच द्विगुणित होतं. * बाईक चालवायची तर ऊन, वारा, पावसापासून बचाव करायला हवा. त्यासाठी जैसलमेरी हा जॅकेटचा प्रकार कॅरी केला पाहिजे. कमी वजनाचं असं हे जॅकेट बायकर्सची शान ठरतंय. * नव्या जमान्याचे शूज आणि ग्लोव्हजचाही वापर केल्यास आपला लूक फॅशनेबल दिसण्यास मदत होईल. अधिक भर घालण्यासाठी ट्रेंडी गॉगल हेसुद्धा एक आॅप्शन आहे. एकदंरीत वरील टिप्स फॉलो केल्यास मोटरसायकल फॅशनचा आनंद तर मिळेलच शिवाय आपली लाइफस्टाइल अपडेट झाल्यासारखे वाटेल.