डेटिंग अॅप न वापरण्याचे एक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2016 11:02 PM
अॅपवर पोटेंशियल डेट्सची जरी कमी नसली तरी तुम्हाला कोणी मिळेल का हे सर्वस्वी तुमच्या दिसण्यावर अवलंबुन आहे.
आॅनलाईनच्या युगात केवळ व्यावहारच नाही तर माणसांच्या दैनंदिन नातेसंबंधातसुद्धा इंटरनेटचा हस्तक्षेप वाढला आहे. सोशल नेटवर्किंग साईट्समुळे लोकांमधील संवाद हरवत चालल्याची ओरड तर होतच आहे; परंतु आॅनलाईन डेटिंग अॅप्सचे वाढते प्रस्थ आता चिंतेचा विषय बनत आहे.समोरासमोर भेटून-बोलून प्रेमात पडण्याऐवजी लोक मोबाईलच्या आडलपून नोकरी शोधावी तसे प्रेम शोधत आहे. आकडेवारी सांगते की, प्रत्यक्षात भेटून डेटिंगसाठी जोडीदार मिळण्यापेक्षा अशा अॅपवर डेट मिळण्याची शक्यता जास्त असते.पण इथं एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, अॅपवर पोटेंशियल डेट्सची जरी कमी नसली तरी तुम्हाला कोणी मिळेल का हे सर्वस्वी तुमच्या दिसण्यावर अवलंबुन आहे.तुमच्या लुक्सवरून लोक तुम्हाला जज करत असतात. दीर्घकाळापासून रिलेशनमध्ये असलेल्या 167 जोडप्यांचे सर्वेक्षण केले असता असे दिसून आले की, डेटिंग सुरू करतेवेळीच भेटलेले लोक समान प्रमाणात आकर्षक होते. म्हणजे जे काही असेल ते समोरासमोर.सहकारी किंवा प्रेमात पडण्या आधी चांगले मित्र असलेले लोकांना जोडीदाराचे दिसणे एवढे महत्त्वाचे नसते. पण आॅनलाईन डेटिंगवर चांगले दिसणे जणू काही अनिवार्य आहे. त्यामुळे अॅपच्या ऐवजी बाहेर पडा आणि दिलखुलासपणे लोकांना भेटा.