आॅस्कर जिंकणे सोपे नव्हते
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2016 12:31 AM
२२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियोच्या हाती आॅस्करची बाहुली आली. त्याला हा पुरस्कार त्याला ‘द रेवेनेंट’ सिनेमात ह्युुज ग्लास भूमिकेसाठी मिळाला. परंतु त्यासाठी ही भूमिका साकारणे सोपे नव्हते, असे त्याने सांगितले.
२२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियोच्या हाती आॅस्करची बाहुली आली. त्याला हा पुरस्कार त्याला ‘द रेवेनेंट’ सिनेमात ह्युुज ग्लास भूमिकेसाठी मिळाला. परंतु त्यासाठी ही भूमिका साकारणे सोपे नव्हते, असे त्याने सांगितले. सिनेमाच्या एका सीनमध्ये लिओनार्डोला म्हशीचे कच्चे लिव्हर खावे लागले होते. मात्र खºया आयुष्यात तो शाकाहारी आहे. परंतु या सीनसाठी लिओनार्डला मांसासारख्या दिसणारे पदार्थ देण्यात आले होते. परंतु त्याला वाटले, की असे करणे चुकीचे ठरेल, मात्र भुमिकेसाठी त्याने हे रिस्क घेतली. सिनेमाच्या शूटिंगनंतर निर्मात्यांनी रहस्य उलगडले होते, की एका विशेष सीनसाठी त्यांना अनेक मुंग्यांची गरज होती. कॅलगरीसारख्या थंड ठिकाणी त्या नव्हत्या. म्हणून त्यांना औरिगन आणि ओंटारियोहून (अमेरिका) मुंग्या आयात कराव्या लागल्या. परंतु वातावरणात होणाºया बदलामुळे मुंग्या रस्त्यातच मृत पावल्या. नंतर त्यांना पुन्हा मुंग्या आयात कराव्या लागल्या.