पासपोर्ट बनविणे झाले अधिक सोपे !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2016 4:50 PM
विदेशात जाण्यासाठी पासपोेर्टची गरज असते. पासपोर्ट बनविण्यासाठी आतापर्यंत जाचक अटी होत्या. त्यामुळे संबंधित व्यक्तीला पायपीट करावी लागायची. पण सध्या विदेश मंत्रालयाद्वारे पासपोर्ट बनवण्याचे नियम आता अधिक सोपे करण्यात आले आहेत.
विदेशात जाण्यासाठी पासपोेर्टची गरज असते. पासपोर्ट बनविण्यासाठी आतापर्यंत जाचक अटी होत्या. त्यामुळे संबंधित व्यक्तीला पायपीट करावी लागायची. पण सध्या विदेश मंत्रालयाद्वारे पासपोर्ट बनवण्याचे नियम आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. त्यात आता पासपोर्टमध्ये आई-वडील दोघांचेही नाव असणे आवश्यक राहणार नाही. तसेच जन्मवेळेसाठी जन्माचा दाखला अनिवार्य असल्याची अट आता काढून टाकण्यात आली आहे. शिवाय आतापर्यंत १९८९ नंतर जन्मलेल्यांना जन्माचा दाखला देणे अनिवार्य होते. परंतु आता या नियमात बदल करण्यात आला आहे.काय आहेत सोपे नियम१. जन्मतिथी प्रमाणपत्रासाठी आता जन्माच्या दाखल्याऐवजी शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) किंवा शिक्षण मंडळातर्फे देण्यात येणारे हायस्कूल सर्टिफिकेटही वापरता येईल. २.आयकर विभागातर्फे देण्यात येणारे पॅन कार्ड देखील जन्मतिथीसाठी सादर करता येईल. परंतु त्यावर जन्मदिनांक नमूद असणे गरजेचे आहे. ३.जन्माचे प्रमाणपत्र म्हणून आपले आधार कार्ड दाखवता येईल. ४.ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र किंवा जीवन बीमा निगमतर्फे घेतलेल्या पॉलिसीचा बॉन्डसुद्धा जन्माचे प्रमाणपत्र म्हणून सादर करता येईल. इंटर मिनिस्टीरियल कमेटीचा अहवाल :१. आॅनलाइन पासपोर्ट अप्लिकेशन फॉर्ममध्ये आता आई-वडील किंवा कायदेशीर पालक यांच्या नावापैकी एकाचेच नाव द्यावे लागेल. यामुळे एकल पालकत्व असलेल्या मुलांचा पासपोर्ट बनविणे सोपे होईल. अर्जदाराच्या विनंतीवरुन नाव प्रिंट करण्यात येईल. २. अर्जासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे सेल्फ डिक्लेरेशन तत्वावर साध्या कागदावर अर्ज लिहून सादर करता येईल. कुठल्याही प्रकारच्या विभागातर्फे, अॅटेस्टेड, नोटरी किंवा स्टँपची गरज भासणार नाही.३. लग्न झालेल्या जोडप्यांना आता लग्नाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. ४. घटस्फोट किंवा वेगळे राहत असल्यास पासपोर्ट अर्जामध्ये पती-पत्नीचे नाव देण्याची गरज नाही. तसेच घटस्फोटाचे प्रमाणपत्र देण्याचीदेखील गरज नाही. लहान मुले व साधू-संतांच्या पासपोर्टसाठीचे काही नियमही बदलले १. अनाथालयात राहणाऱ्या मुलांकडे जन्माचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नसेल त्यांना अनाथालयाच्या मुख्य अधिकाºयाकडून मिळालेले शपथपत्र दाखल करावे लागेल. २. आई-वडील ज्या वेळी स्वत:साठी अर्ज करत असतील त्याच वेळी गर्भातील मुलांसाठीदेखील अर्ज करता येईल. ३. आतापर्यंत मूल दत्तक घेतल्यावर पासपोर्टसाठी दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र देणे गरजेचे होते. परंतु आता प्रमाणपत्राऐवजी साध्या कागदावरही शपथपत्र सादर करता येईल. ४. ज्या सरकारी कर्मचाऱ्याना आपल्या विभागातर्फे ओळखपत्र किंवा एनओसी मिळत नसेल व त्यांना पासपोर्टची नितांत गरज असेल, असे लोक पासपोर्ट अथॉरिटीकडे साध्या कागदावर घोषणापत्र लिहून देऊन पासपोर्टसाठी निवेदन देऊ शकतात. परंतु आपण आपल्या कार्यालयात याविषयी माहिती दिली असल्याचे त्या अर्जात त्यांना नमूद करावे लागेल.५. साधू-संतांच्या पासपोर्ट नियमांमध्येदेखील महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता साधू-संत पासपोर्टमध्ये आपल्या आई-वडिलांऐवजी आपल्या धर्मगुरुचे नाव देऊ शकतात. यासोबत त्यांना आपले असे ओळखपत्र सादर करावे लागेल ज्यामध्ये त्यांच्या गुरूचे नाव नमूद केलेले असेल.