शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

धोती आणि ट्यूलिप पॅण्टसमुळे पेहेरावाला मिळतो फॅशनेबल टच! तुम्ही ही फॅशन केली आहे का?

By admin | Published: May 29, 2017 6:49 PM

वॉर्डरोबमध्ये असल्याच पाहिजेत अशा दोन स्टायलिश पॅण्टस म्हणजे ट्यूलिप आणि धोती. तुम्ही केली आहे का ही फॅशन?

 

-मोहिनी घारपुरे- देशमुख  

वॉर्डरोबमध्ये असल्याच पाहिजेत अशा दोन स्टायलिश पॅण्टस म्हणजे ट्यूलिप आणि धोती. अलिकडच्या काळातल्या या दोन्ही स्टायलिश पॅण्ट्स महिलांच्या सौंदर्यात अधिकच भर घालण्यात यशस्वी ठरलेल्या आहेत. त्यांपैकी धोती हा प्रकार खरंतर पुरूषी वर्चस्व असलेला. पण फॅशनच्या जगात असा स्त्री पुरूष भेद नाहीच. उलट फॅशन विश्वानं अनेक नवे आयाम सौंदर्याला दिले आहेत, त्यापैकीच एक धोती आणि ट्युलिप पॅण्टस.

धोतीची फॅशन

खरंतर आपल्याकडे पुरूषांच्या पारंपरिक पोषाखाचा भाग असलेली धोती महिलांच्या वॉर्डरोबमध्ये केव्हा स्थानापन्न झाली ते लक्षातही आलं नाही. सुरूवातीला धोती स्टाईलच्या सलवारी आणि त्यावर कुर्ती असा पेहराव पंजाबी ड्रेसमधील स्टाईल म्हणून स्वीकारला गेला. त्यानंतर हळूच या धोती सलवार मागे पडत त्याऐवजी धोती पॅण्टसनी वॉर्डरोबमध्ये जागा मिळवली.

 

                              

अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सनी बाजारपेठेत या धोती पॅण्ट्समध्ये भरपूर प्रकार आणले. विशेषत: रंग आणि कापडाचा पोत यांत वैविध्य आणून या धोती पॅण्टसमध्ये व्हरायटी आणलेल्या दिसतात. सिंगल कलर, मल्टी कलर, लेस बॉर्डर, लायक्रा , कॉटन, क्रेप , शिफॉन अशा कित्तीतरी प्रकारच्या धोती पॅण्ट्स दिसायलाही अत्यंत आकर्षक दिसतात.

अत्यंत आरामदायी अशा या पॅण्टस उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही वापरता येतात. पावसाळ्यातही हलक्या शिडकाव्यांमध्ये या धोती पॅण्टस सहज वापरता येतात. या पॅण्टसवर शॉर्ट कुर्ती, वेस्टर्न टॉप्स, नी लेंग्थ कुर्ती देखील घालता येतात.

 

ट्यूलिप पॅण्टस

धोती पँट्सप्रमाणेच सध्या ट्यूलिप पॅण्टसचीही भरपूर क्र ेझ आहे. फॅशनेबल रहाणाऱ्या आधुनिक तरूणींच्या वॉर्डरोबमध्ये ट्यूलिप पॅण्टस हमखास आढळतील. गेल्या वर्षी तर फॅशन इंडस्ट्रीमध्ये या ट्यूलिप पॅण्ट्सनी एकच धुम केली होती. उन्हाळी फॅशन म्हणून या ट्यूलिप पॅण्टस आणि स्कर्टसनी हक्काचं स्थान मिळवलं आहे. ट्यूलिपच्या फुलाप्रमाणेच या पॅण्टसला आकर्षक पद्धतीनं कट दिलेले असतात. विशेषत: पायाच्या घोट्यापाशी अशा रितीनं आकार दिलेला असतो जणू ट्यूलिपच्या पाकळ्याच असं वाटतं.

 

         

ट्यूलिप स्कर्ट्सचंही सौंदर्य अशा कट्सनेच खुलवलेलं असतं. काहीशा तलम, झुळझुळीत कपड्यांमध्ये या पॅण्ट्स शिवल्या जातात. तसेच स्कर्टसाठीही सुंदर फॉल येईल असाच कपडा आणि फ्रेश कलर्स वापरले जातात. या पॅण्टसवर शॉर्ट शर्ट, शॉर्ट कुर्ता घातल्यास त्याचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. या पॅण्टस घातल्या की पायात मात्र हाय हील्स, स्टेलेटोजच घालायला हवेत. तरच या दोन्हीही पॅण्टसद्वारे तुमची देहबोली आणि शरीरसौष्ठव अधिक खुलेल यात शंका नाही.