‘स्नॅपचॅट’ची लोकप्रियता वाढतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2016 1:07 PM
‘स्नॅपचॅट’ आता मध्यमवयीन लोकांमध्येदेखील लोकप्रिय होताना दिसत आहे.
सोशल मीडियामध्ये सतत काही ना काही बदल होत असतो. नवा ट्रेंड, नवे फॅड. सध्या अमेरिके तील तरुणांना कशाची भुरळ पडली असेल तर ती म्हणजे ‘स्नॅपचॅट’ची. स्नॅपचॅट हे फोटो मेसेजिंग कम्युनिटी असून तुम्ही मित्रांना फोटोद्वारे संदेश देऊ शकता. याचे वेगळेपण म्हणजे पाठवलेला फोटो तुम्ही ठरवलेल्या वेळेनंतर आपोआप डिलिट होऊन जातो.सुरुवातील केवळ १८ ते २५ वयोगटातील तरुणांचे फॅड असणारे ‘स्नॅपचॅट’ आता मध्यमवयीन लोकांमध्येदेखील लोकप्रिय होताना दिसत आहे. एका दैनिकाने केलेल्या सर्व्हेक्षणातून असे समोर आले की, अमेरिकेत स्मार्टफोन वापरणाºया ३५ वर्षांपेक्षा मोठ्या प्रौढांमध्ये १४ टक्के स्नॅपचॅट यूजर्स आहेत. तीन वर्षांपूर्वी हे प्रमाण केवळ दोन टक्के होते. एवढेच नाही तर अमेरिके तील एकूण स्मार्टफोन यूजर्सपैकी ७० टक्के लोक स्नॅपचॅटचा वापर करतात. दोनच आठवड्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांनी स्नॅपचॅटवर अकाउंट सुरू केले आहे. कंपनीची प्रवक्ता म्हणाली की, पारंपरिक सोशल मीडियामध्ये लाईक्स, कमेंट्सची गर्दी आणि अडगळ स्नॅपचॅटमध्ये नाही. म्हणून आजच्या पीढीच्या ते पसंतीस उतरत आहे.