प्रसिद्धी पाकी कव्वाल अमजद साबरी यांची गोळ्या झाडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2016 1:51 PM
प्रसिद्धी पाकी कव्वाल आणि सुफी गायक अहमद साबरी यांची आज अज्ञात मारेकºयांनी गोळ्या झाडून हत्या केली.
प्रसिद्धी पाकी कव्वाल आणि सुफी गायक अमजद साबरी यांची आज अज्ञात मारेकºयांनी गोळ्या झाडून हत्या केली. ४५ वर्षांचे साबरी ब्रदर्स या कव्वाली ग्रुपचे सर्वेसर्वा अमजद साबरी यांची बुधवारी दुपारी कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अमजद साबरी यांच्या मोटारीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या साबरी यांना लगेचच रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अमजद साबरी आणि त्यांच्या एक सहकारी दोघेही मोटारीतून निघाले असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून लियाकताबाद भागामध्ये त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या मेंदूत घुसल्याचे पाकिस्तानातील डॉन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे अमजद पाकिस्तानचे लोकप्रिय कव्वाली गायक मकबूल साबरी यांचे भाचे होते. मकबूल यांचे 2011 मध्ये निधन झाले होते. अमजद यांच्या दोन कव्वाली अत्यंत गाजल्या. शिवाय 'भर दो झोली', 'ताजदार-ए-हरम' आणि 'मेरा कोई नहीं है तेरे सिवा' ही गाणे लोकांच्या ओठांवर आहेत. साबरी एक यशस्वी व्यावसायिकही होते. साबरी यांना पाकिस्तानमध्ये लोकप्रिय कव्वाली गायक म्हणून ओळखले जात होते.2014 मध्ये इस्लामाबाद हायकोटार्ने ईशनिंदेच्या आरोपात जियो आणि एआरवाय न्यूजला नोटिस जाहीर केली होती. या दोन्ही वाहिन्यांनी मॉर्निंग शोमध्ये एक कव्वाली दाखवली होती. या कव्वालीमध्ये लग्नाचा उल्लेख करुन धार्मिक भावना दुखावण्यात आल्या होत्या. लोकांनी त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी अमेरिका आणि युरोपच्या काही देशांमध्ये कार्यक्रम केले होते.