पुणेकरांचा असाही रेकॉर्ड, फिटनेसमध्ये भारतात ‘नंबर १’ !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2017 7:39 AM
नुकताच फिटनेस ब्रॅण्ड रिबॉकने फिट इंडिया सर्वे केला आणि त्यात पुणेकरांनी फिटनेसच्या बाबतीत भारतातून नंबर १ येण्याचा मान मिळविला.
निरोगी आयुष्य जगायचे असेल तर फिटनेसबाबत जागरुक असणे खूप आवश्यक आहे. याची जाणिव बऱ्याचजणांना असते आणि फिट राहण्यासाठी खूप प्रयत्नही करतात मात्र बहुतेकजण याकडे दुर्लक्ष करतात आणि अनफिट राहतात. याच धर्तीवर नुकताच फिटनेस ब्रॅण्ड रिबॉकने फिट इंडिया सर्वे केला आणि त्यात पुणेकरांनी फिटनेसच्या बाबतीत भारतातून नंबर १ येण्याचा मान मिळविला. या सर्वेक्षणात ६० टक्के भारतीय आठवड्यातून किमान चार तास आपल्या फिटनेससाठी देतात. यामध्ये पुणेकर सर्वाधिक वेळ देत असल्याचे समोर आले आहे. पुण्याचा फिटनेस स्कोअर ७.६५ टक्के एवढा आहे. यावरु न सर्व शहरांमध्ये पुणेच्या फिट स्कोअर सर्वाधिक आहे. पुण्यानंतर चंदीगडचा फिटनेसमध्ये क्रमांक लागतो. चंदीगडचा फिटनेस स्कोअर ७.३५ टक्के आहे. त्यामुळे असे लक्षात आले की, देशभरात पुणेकर फिटनेससाठी सर्वात जास्त वेळ देतात. एवढंच नाही तर, एकापेक्षा जास्त फिजिकल अॅक्टिव्हिटी करतात. या फिटनेस टेस्टमध्ये २० ते ३५ वर्षाचे १५०० महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्वेक्षणात असेही आढळून आले की, दक्षिणेकडील हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नई यासारखी शहरं याबाबतीत बरीच मागे आहेत. त्यांचा फिटनेस स्कोअरही खूप कमी आहे.