इंग्लंडच्या राणीचा ख्रिसमस संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:08 AM
दरवर्षीची परंपरा कायम राखत इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय यांन...
दरवर्षीची परंपरा कायम राखत इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी नाताळनिमित्त सर्व जनतेला विशेष संदेश दिला आहे. या संदेशात राणी एलिझाबेथ म्हणतात, वाईटपणावर नेहमी चांगुलपणाचा विजय होतो. लोकांनी निराशेत आशा सोडू नये.कितीही घनघोर अंधार असला तरी प्रकाश दडून राहत नाही. नाताळ हा आपल्याला मदत केलेल्या सर्व लोकांचे आभार मानण्याचा काळ असतो. या संदेशात त्यांनी दुसर्या महायुद्ध समाप्तीला ७0 वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून शहीद झालेल्या सर्व सैनिकांनासुद्धा आदरांजली वाहिली. ख्रिसमसला संदेश देण्याची परंपरा राणीचे आजोबा किंग जार्ज पाचवे यांनी १९३२ मध्ये सुरू केली होती.