रॅफ सिमन्स कॅल्विन क्लायनचा नवा क्रिएटिव्ह डिरेक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2016 4:44 PM
अमेरिकन फॅशन जगतात सिमन्सचे पदार्पण होत आहे म्हटल्यावर सर्वत्रच याची चर्चा सुरू आहे.
अनेक महिन्यांच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम लावत अखेर रॅफ सिमन्स अमेरिकन फॅशन ब्रँड ‘कॅल्विन क्लायन’चा प्रमुख क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून रुजू होणार आहे. फेसबुकवर सिमन्सच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. अमेरिकन फॅशन जगतात सिमन्सचे पदार्पण होत आहे म्हटल्यावर सर्वत्रच याची चर्चा सुरू आहे.कंपनीचा सीईओ स्टीव्ह शिफमन म्हणाला की, सिमन्सच्या नियुक्तीद्वारे ‘केल्विन क्लायन’मध्ये नवा अध्याय सुरू होत आहे. कंपनीच्या संस्थापकाची जी फॅशनबद्दलची दृष्टी होती, ती आणखी दोन पाऊले पुढे नेण्यात सिमन्सची आम्हाला नक्कीच मदत होणार आहे. आधुनिक फॅशनमध्ये त्याचे योगदान अतुल्य आहे. त्यामुळे त्याच्या साथीने कंपनीची जागतिक फॅशन ब्रँड म्हणून ओळख आणखी मजबुत होईल याची आम्हाला खात्री आहे.तीन वर्षे फ्रेंच फॅशन ब्रँड ‘डिआॅर’चा क्रिएटिव्ह संचालक म्हणून काम केल्यानंतर त्याने ते सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या जागी मग इटालियन डिझायनर मारिया ग्रात्झी कीयूरीची ‘डिआॅर’च्या क्रिएटिव्ह डिरेक्टरपदी निवड करण्यात आली होती. तेव्हापासूनच सिमन्स कोणती आॅफर स्वीकारणार याची उत्सुकता लागलेली होती. गेल्या एप्रिल महिन्यात खुद्द केल्विन क्लायनने पुढील कंपनीचा पुढील क्रिएटिव्ह डिरेक्टर कोण असणार याबाबत सुतोवाच केला होता. फ्रान्सिस कोस्टानंतर कोण हा प्रश्न फॅशन इंडस्ट्रीमध्ये विचारला जात असे. सिमन्स आता कंपनीच्या उत्पादरनात कोणते क्रिएटिव्ह बदल आणतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.