केवळ एका मुलीसाठी धावली कित्येक वर्ष रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2016 12:08 PM
मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये, याकरित रेल्वे चालूच ठेवली
जीवनामध्ये शिक्षण घेणे हे खूप गरजेचे आहे. त्याकरिता वेगवेगळे देश आपआपल्या परीने सर्वांना शिक्षण मिळावे, याकरिता योजना राबवीत असतात. अशीच एक कौतुकास्पद योजना जपानमधील आहे. ती वाचून तुम्ही आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाहीत. जपान सरकारने प्रवासी नसतानाही एका मुलीचे शिक्षण पूर्ण व्हावे, याकरिता रेल्वे सुरु ठेवली. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारने ती रेल्वे बंद के ली आहे. जपानमधील ‘शिराताका’ नावाचे एक स्टेशन आहे. तेथे प्रवासी नसल्याने, त्यामुळे रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, तेथून एक मुलगी या रेल्वेने दररोज शाळेत जात होती. तिच्या शिक्षणात खंड पडू नये, याकरिता प्रशासनााने ती रेल्वे चालूच ठेवली. रेल्वे प्रशासनाचे नुकसान होत असतानाही हा निर्णय कायम ठेवण्यात आला. गेले कित्येक दिवस ही रेल्वे केवळ एका मुलीसाठी धावत होती. जपान सरकार शिक्षणाला किती प्राधान्य देते, हे या गोष्टीवरुन स्पष्ट होते. त्यामुळे जगभर जपान सरकरच्या या कौतुकास्पद योजनेची र्चा होत आहे.