शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

पावसाळ्यात पुरूषांसठी आहे ‘हवाईअन शर्टस’ची फॅशन. या फॅशनमागे आहे हवाई देशातली एक मजेशीर परंपरा.

By admin | Published: July 17, 2017 6:43 PM

हिरव्या ॠतूूत घराबाहेर पडताना तरूणी आणि महिलांसाठी ज्याप्रमाणे बॉटनिकल ड्रेसेसचा पर्याय आहे त्याप्रमाणेच या रंगीबेरंगी हवाईन शर्ट्सचा पर्याय पुरूषांसाठीही आहे.

- मोहिनी घारपुरे-देशमुखॠतूप्रमाणे आपला वॉर्डरोब अप टू डेट ठेवण्यात फक्त मुलींना आणि महिलांनाच रस असतो असं नाही. मुलांना आणि पुरूषांनाही हे आवडतं.पावसाळ्यात आपल्या वॉर्डरोबमध्ये नवीन काही असण्याची खाज पुरूषांनाही असते. आता यासाठी हवाईअन शर्ट हा एक उत्तम पर्याय आहे. या हिरव्या ॠतूूत घराबाहेर पडताना तरूणी आणि महिलांसाठी ज्याप्रमाणे बॉटनिकल ड्रेसेसचा पर्याय आहे त्याप्रमाणेच या रंगीबेरंगी हवाईन शर्ट्सचा पर्याय पुरूषांसाठीही आहे. शॉर्ट स्लीव्हस, लूझ फिटींग आणि ओपन कॉलर ही या हवाईयन शर्टची खासियत आहे. हे अशा प्रकारचे शर्ट्स विशेषत्त्वानं हवाईतील पुरूष परिधान करतात, त्यावरूनच या शर्ट्सला हवाईअन शर्ट असं नाव देण्यात आलं आहे. याच शर्ट्सला ‘अलोहा शर्ट ’असंही म्हणतात. या शर्ट्सचे कापड तलम, झुळझुळीत, रंगीबिरंगी प्रिंटेड अशा पद्धतीचं असतं. तसेच या कपड्यावर फुलं, पानं, पक्षी, समुद्र वगैरेंच्या बोल्ड प्रिंट्स असतात.

 

हवाईतील स्थानिक स्त्रिया आणि पुरूषांमध्ये कपड्यांची एक निराळीच स्टाइल पाहायला मिळते. येथील पुरूष लग्नसमारंभ, वाढदिवस किंवा अन्य कोणत्याही समारंभात हे हवाईअन शर्ट्स घालतात तर त्यांना कॉम्प्लिमेण्ट करणाऱ्या त्यांच्या महिला जोडीदार अशा वेळी एक झग्यासारखा गाऊन परिधान करतात. या विशिष्ट पद्धतीच्या महिलांच्या गाऊन्सला तेथे ‘मुमू’ असं म्हटलं जातं. आणखी एक गंमत म्हणजे हे रंगीबेरंगी शर्ट्स हवाईतील पुरूष अलिकडे विशेषत्त्वानं कामाच्या ठिकाणी कॅज्युअल वेअर म्हणूनही घालतात. त्यातही तेथे शुक्र वारी अर्थात वीकेण्डच्या दिवशी अलोहा फ्रायडे साजरा करण्याची जणू परंपराच आहे. या परंपरेत कॉर्पोरेट महिलाही सहभागी होतात. अलोहा फ्रायडे ही संकल्पना एक विस्तृत रूप घेत आहे. हवाईतील लोक दर शुक्र वारी अलोहा शर्ट्स घालून एकत्रितपणे आॅफीसला येतात आणि ‘थँक गॉड इट्स फ्रायडे’ अर्थात ‘टीजीआयएफ’ ही फ्रेज याद्वारे प्रत्यक्षात आणतात. हवाईतील किमो कहोआनो आणिउ पॉल नाट्टो यांच्या 1982 मधील, इट्स अलोहा फ्रायडे, नो वर्क टील् मंडे या गाण्याशी ही फ्रेज रिलेटेड असून विशेष म्हणजे हवाईतील रेडीओ स्टेशन्सवर हे गाणं दर शुक्र वारी ऐकवलं जातं.

 

हवाईअन शर्ट हा एक संपूर्णत: अभ्यासाचा विषयही ठरला आहे. आपल्या बालपणापासूनच आईवडिलांबरोबर हवाईअन शर्टच्या व्यवसायात असलेल्या डेल होप यांनी तर या विषयावर 2000 साली दी अलोहा शर्ट - स्पिरीट आॅफ दी आयलॅण्ड हे पुस्तकच लिहिलं. अल्पावधीतच हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालं आणि या पुस्तकाची जॅपनीज प्रिंट एडीशनही 2003मध्ये बाजारात आली. त्यानंतर अमेरिकन पोस्ट खात्यानं 2012मध्ये गव्हर्नर नील एबेर क्रोम्बी यांच्या प्रोत्साहनानं चक्क अलोहा शर्ट स्टँप्स देखील काढले. लवकरच डेल होप आता जॅक मॅककॉय यांच्यासह या विषयावर चित्रपटही काढत असल्याचे त्यांच्या ‘दी अलोहा शर्ट डॉट कॉम’ या संकेतस्थळावर त्यांनी जाहीर केलं आहे. तर, असे हे हवाईअन शर्ट्स. हवाईमध्ये हे जितके लोकप्रिय आहेत तितकेच आंतरराष्ट्रीय फॅशन जगतातही लोकप्रिय होत आहेत. मुली आणि महिलाही घालू शकतात हवाईअन शर्ट्स ...हवाईयन शर्ट्सची खासियत अशी की ते चक्क महिला आणि लहान मुलंमुलीही घालू शकतात. कॅज्युअल वेअर म्हणून हे शर्ट्स एकदम कूल दिसतात. यावरील रंगसंगती आणि प्रिंट्स तसेच ओपन कॉलर, व्ही नेक अनेक स्त्रियांवर खुलून दिसतो. तसेच लहान मुलामुलींना या शर्ट्सवर योग्य त्या एक्सेसरीज आणि एखादी रंगीत हॅट घातली तर एकदम क्यूट लूक मिळतो

 

.