येथे बरसतोय हिºयांचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2016 12:48 AM
शनी आणि गुरूवर मोठ्या प्रमाणात हिरे आहेत.
युरेनस व नेपच्यून या ग्रहांच्या गाभ्यात हिरे आहेत हे तीस वर्षांपासून माहीत असले तरी गुरू व शनीवरील स्थिती घन हिºयांना अनुकूल नाही पण ते हिरेच आहेत यात शंका नाही असे संशोधकांचे मत आहे. शनी आणि गुरूवर मोठ्या प्रमाणात हिरे आहेत. त्यांच्या अंदाजानुसार द्र्रव हायड्रोजन व हेलियम द्र्रवावर हे हिरे तरंगत आहेत, अशी माहिती ग्रहीय विज्ञानात संशोधन करणाºया व्यक्तींनी दिलेय. नासाच्या नवीन माहितीनुसार शनीवर हे हिरे नेमके किती खोलवरच्या भागात आहेत हे समजलेले नाही. यातील काही मोठे हिरे असून त्यांना डायमंडबर्ग म्हणजे हिरेनग (हिमनगप्रमाणे) म्हणता येईल.कॅलिफोर्नियातील ग्रहीय वैज्ञानिक मोना एल. डेलिटस्की, विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठाचे केविन एच बेन्स यांनी तेथील कार्बनबाबत जी माहिती गोळा केली त्यावरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. म्हणजे आता हिºयांच्या टेकड्या पहायच्या असतील तर या ग्रहांची सफर करायलाच हवी.