फेस्टिव्हलचा लूक म्हटलं की, सिल्क, ब्रोकेड आणि बनारसी लूक ट्राय करण्यात येतो. पण सध्या सिम्पल पण क्लासी लूकची फॅशन असल्याने सध्या खादीचा ट्रेन्ड सगळीकडे पाहायला मिळतोय. खादीमुळे सिम्पल आणि क्लासी लूक मिळतो. रक्षाबंधनच्या निमित्ताने खादीचे सूट, साडी, लॉन्ग स्कर्ट आणि ट्रेडिशनल डिझाइनचे टॉप बनवण्यात येतात. या रक्षाबंधनाच्या च्या निमित्ताने खादीच्या फॅसनबाबत जाणून घेऊयात...
भावा-बहिणीचे मॅचिंग आउटफिट्स
रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक नवीन फॅशन बाजारामध्ये ट्रेन्ड करत आहे. जिथे भाऊ आणि बहिणींसाठी मॅचिंग आउटफिट्स तयार करत आहेत. खादीमध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळ्या रंगाचे आउटफिट्स रक्षाबंधनाच्या निमित्ताने नक्की ट्राय करा.
एक्सेसरीजमध्ये खादी ट्रेन्ड
रक्षाबंधनच्या निमित्ताने खादी आणि कॉटन टच असलेले वेगवेगळ्या एक्सेसरीज बाजारात उपलब्ध आहेत. मेटल सोबत फॅब्रिक ज्वेलरी खादीमध्ये फार सुंदर दिसतात. यामुळे एक सिम्पल आणि क्लासी लूक मिळतो. यामध्ये ब्रसलेट, नेकपीस, इयरिंग उपलब्ध आहेत.
खादी जॅकेट्स
बाजारामध्ये खादी जॅकेट्सही अवेलेबल आहेत. जॅकेट्स तुम्ही शर्ट किंवा कुर्त्यावर वेअर करू शकता. यामुले तुम्हाला एक सोबर लूक मिळतो.
खादीच्या साड्या
बाजारामध्ये खादीच्या वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये खादीच्या साड्यांचाही समावेश आहे. खादीच्या साड्यांमुळे एक सिम्पल आणि सोबर लूक मिळतो. अनेक अभिनेत्रीही खादीच्या साडी वापरताना पाहायला मिळतात.