रक्षाबंधन दोन दिवसांवर आलेलं असतानाही तुम्ही लूकसाठी कन्फ्युझ असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आम्ही इन्स्टाग्रामवरून तुमच्यासाठी आलिया भट्टचे काही पॉप्युलर लूक्स आणि सर्वात स्टायलिश इंडियन ऑउटफिट घेऊन आलो आहोत. जे तुम्ही या रक्षबंधनसाठी ट्राय करू शकता. पण आता तुम्ही पुन्हा गोंधळला असाल की एवढ्या कमी वेळामध्ये आलियासारखा लूक करणं शक्य नाही. पण हे हटके लूक तुम्ही सहज ट्राय करू शकता.
1. लॉन्ग कॉटन कुर्ती
तुम्हाला मार्केटमध्ये या प्रकारचं प्रिंट सहज उपलब्ध होईल. नाहीतर तुम्ही कॉटन फॅब्रिकचं कोणतंही कापड खरेदी करू शकता. शिवण्यासाठीही हा कुर्ता फार सोपा आहे. इतका सिम्पल असूनही हा कुर्ता स्टायलिश दिसतो.
2. टॉप अॅन्ड जॅकेट
जर रक्षबंधनच्या दिवशी तुम्हाला इंडियन आणि वेस्टर्न कॉम्बिनेशन ट्राय करायचं असेल तर मार्केटमधून तुम्ही लॉन्ग किंवा सिम्पल कुर्ती घेऊन या. त्यावर घालण्यासाठी प्लेन व्हाइट स्लिव्हलेस जॅकेट्स आणा. आउटफिटसोबत मोठे ट्रेडिशन झुमके ट्राय करू शकतात. यामुळे तुम्हाला इंडियन आणि वेस्टर्न लूक मिळेल.
3. इंडियन स्टाइल स्कर्ट-टॉप
हुबेहुब असा ड्रेस नाही मिळाला तर फेयरी स्टाइल टॉप घ्या आणि त्यासोबतच प्रिंट स्कर्ट घ्या. यामध्ये रंगाच्या बाबती तुम्ही एक्सपरिमेंट करू शकता पण एवढं लक्षात ठेवा की, दोघांचा रंग डार्क असू नये.
4. लॉन्ग टॉप विथ पलाझो
मार्केटमध्ये अनेक पलाझो मिळतात. यामध्ये वेगवेगळ्या स्टाइलपासून महाग-स्वस्त पलाझोंचाही समावेश आहे. तुमच्या बजेटनुसार एक प्रिंटेड पलाझो विकत घ्या. त्यावर प्लेन टॉप घातलात तर त्याचा लूक फार छान दिसेल.
5. ट्रेडिशनल पण स्टायलिश लहेंगा
जर तुमचं बजेट खूप असेल आणि रक्षाबंधनसाठी एक क्लासी लूक तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी ट्रेडिशनल किंवा स्टायलिश लेहंगा तुम्ही ट्राय करू शकता. आलियाने फोटोमध्ये घतलेला लेहेंगा ट्रेडिशनल असण्यासोबतच स्टायलिशही आहे.
6. कॉटन सूट
मार्केटमध्ये अनेक कॉटन सूट उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला अनेक व्हरायटीही मिळतात. आलियाने घातलेला सूटही फार क्लासी आहे. तुम्ही यावर सिल्वर एक्सेसरीजही घालू शकता.
7. हेव्ही सूट विथ सिम्पल दुपट्टा
जर एका दिवसात ड्रेस शिवून घेणं शक्य असेल तर मार्केटमधून चंदेरी सिल्कचा कपडा घेऊन या. फ्रॉक स्टाइलमध्ये फ्लोर टच ड्रेससोबत पलाझो आणि त्यासोबत नेटचा दुपट्टा कॅरी करू शकता.