शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

या 9 आयडिया वाचा. घरातल्या भिंती सजवायला बाजारातल्या महागड्या पेंटिंग्जची गरज भासणार नाही!

By admin | Published: June 01, 2017 7:08 PM

पेंटिंग्ज, फ्रेम्स, फोटोज हे पर्याय टाळून आपल्या स्वत:च्या हातानं आणि कल्पकतेनंही भिंतींना सजवता येतं.

- सारिका पूरकर-गुजराथीघराची मुख्य बैठक असू देत किंवा बेडरुम. ओक्या बोक्या भिंती बघितल्या की कसंसच होतं. आता भिंती सजवायचं म्हटलं तर पेंटिंग्ज, फ्रेम्स, फोटोज हेच पर्याय नेहमी हाताळले जातात. पण हे पर्याय टाळून आपल्या स्वत:च्या हातानं आणि कल्पकतेनंही भिंतींना सजवता येतं. अशा भिंती जेवढं सुखं आपल्याला देतात तितकंच पाहुण्या मंडळींनाही. पोलका डॉट्सयासाठी भिंतींवर तुम्हाला हव्या त्या ठिकाणी गोलाकार काढायचे आहेत. पोकळ नव्हे तर भरलेले. बाजारात विविध रंगात, आकर्षक डिझाईन्समध्ये वाशी टेप मिळतात. त्यापासून हे गोलाकार बनवा आणि भिंतीवर ठराविक अंतरावर लावून सुंदर फील मिळवा.

 

               थ्रीडी कलरब्लॉकबाजारात थ्रीडी कलरब्लॉक मिळतात. ते देखील आकर्षक रंगसंगतीत आंओ गोलाकारातील घ्या आंओ भिंतींवर त्याची कल्पक रचना करुन भिंतीला हटके लूक द्या.टी कप पेंटिंग एरवी बैठकीत छान छान पेंटिंग्ज लावली जातात. किचनला कोणी विचारतच नाहीत. किचनमध्ये तुम्हाला क्राफ्टी लूक द्यायचा असेल तर आर्ट पेपरमधून चहाचा कप, चहाची बशी आणि किटली असे आकार कापून घ्या. किटलीचा एक आणि कप-बशीचे चार-पाच आकार कापून घ्या. एका प्लेन कागदावर या कप-बशींना, किटलीला चिकटवून टाका. रचना मात्र सुंदर हवी. प्रत्येक कप-बशीसाठी वेगळा आणि आकर्षक रंगाचा कागद वापरा. हा कागद किचनमध्ये लावावा. तसेच तो फ्रीजवर, कपाटांच्या दरवाजांवरही लावू शकता.

 

     

मेसेज करा अरेंजहा एक फन फंडा म्हणून ट्राय करा. तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो अगदी कमी शब्दात असेल असा निवडा. म्हणजे सेव्ह वॉटर, सेव्ह ट्रीज किंवा अन्न नासाडी टाळा. या संदेशातील अक्षरं एका छोट्या चौकोनी कागदावर ठळक मार्करनं काढून घ्या. हे कागद एका छोट्या क्लिपबोर्डवर अडकवा (परीक्षेला आपण वापरतो ते पॅड). आणि हे सर्व क्लिपबोर्डवर भिंतीवर लावा. अक्षरांची उलटसुलट रचना करा. घरी पाहुणे आल्यास त्यांना या अक्षरांमध्ये दडलेला संदेश शोधायला सांगा. त्आहे की नाही गंमत.या अशा कल्पनेतून भिंती सजतातही आणि त्यांना सोशल टच ही मिळतो.

कागदी पंखेलहानपणी गंमत म्हणून कागदाला घड्या घालून पंखे बनवलेत ना तुम्ही ? मग त्याच पंख्यांचा वापर आता भिंत सजवण्यासाठी करायचाय तुम्हाला. फक्त त्यासाठी रंगीत आणि चांगल्या प्रतीचे आर्ट पेपर वापरा आणि लहान आकारात गोलाकारात हे पंखे बनवा. असे विविध रंगात खूप सारे पंखे बनवून झाले की त्याची आकर्षक रचना भिंतीवरील फोटोंभोवती करा किंवा प्लेन भिंतीवर करा. छानच दिसेल!

 

  पंच आर्टपेपर पंच हा अगदी सोपा प्रकार आहे. लहान मुलंही ते आरामात करतात. रंगीत पेपर आणि विविध पाना-फुलांचे भौमितीय आकारांचे पंच मशीन मुलांना देऊन टाका. पंच करुन आकार कापून कापलेल्या आकारांची रचना प्लेन कागदावर करा. झाले आर्टपीस तयार.रिबन आर्ट बाजारात अनेक रंगांमध्ये व कमीअधिक रुंदीच्या सॅटिन रिबन्स मिळतात. तुमच्या आवडीच्या चार-पाच रंगांच्या आणि मध्यम रुंदीच्या (५ ते ८ सेंमी रुंदीच्या )रिबन्स घ्या. चार चौकोनी कागदाचे तुकडे (१० बाय १४ इंच) घ्या. प्रत्येक तुकड्यावर रिबनचे तुकडे आडवे-उभे न चिकटवता तिरपे चिकटवत चला, चिकटवताना योग्य अंतर (खूप जवळ व खूप दूर नको) आणि रंगसंगतीवर भर द्या. चारही तुकड्यांना एकत्र जोडल्यावर रिबनची टोकं एकमेकांना जुळतील असं बघा. चारही तुकडे बनवून झाले की एका दुसऱ्या मोठ्या कागदावर हे तुकडे जवळजवळ चिकटवून टाका. फ्रेम करून लावा भिंतीवर.

 

     हार्ट आर्ट बाजारात विविध रंगात पेण्ट चीप्स अर्थात रंगीत आर्ट पेपरचे तुकडे मिळतात. त्या पेपरमधून हार्टचे आकार पंच मशीनच्या सहाय्यानं कापून घ्या. रंगसंगती निवडताना शेडिंगवर भर द्या. म्हणजे एकाच रंगाचे नकोत. भरपूर आकार कापा. चार कॅनव्हासच्या तुकड्यांवर एका रांगेत हे आकार चिकटवा. त्यासाठी अ‍ॅडेसिव्ह फोम सर्कलचा वापर करा. म्हणजे थ्रीडी लूक येईल. चारही कॅनव्हासवर चिकटवून झाले की फ्रेम करा आणि चारही फ्रेम्स भिंतीवर अरेंज करा. प्लोटिंग वॉल आर्टतुमच्याकडे शूज, सॅण्डल्स यांचे रिकामे खोके धुळ खात पडले असतील आणि ते तुम्ही फेकण्याच्या विचारात असाल तर तसे करु नका. त्याऐवजी हा फंडा ट्राय करा. खोक्यांची झाकणं घ्या. काही आकर्षक रंगसंगतीचे वापरात नसलेले कापडाचे तुकडे घ्या. मॉड पॉज ग्लूच्या सहाय्यानं कापड झाकणावर चिकटवून टाका. पुन्हा एक कोट द्या. असे विविध कापड लावून पाच- ते सहा झाकणं तयार करा आंओ भिंतीवर आर्ट पीस म्हणून रचना करा. झाकणाला आकर्षक कागद चिकटवून आतील बाजूवर तुमचे फोटोज देखील तुम्ही चिकटवू शकता आणि भिंतीवर ते लावू शकता. खोक्याच्या आतील आणि बाहेरील बाजूंवर ब्राईट रंग देऊन घ्या. आत आणि बाहेर वेगळे रंग हवे. चार-पाच खोके रंगवून झाले की पेंटर्स टेपच्या सहाय्यानं हे खोके भिंतीवर शेल्फ म्हणून चिकटवा. यात तुम्ही छोट्या सजावटीच्या वस्तू सहज ठेवू शकता.